Girls Fight Video Viral: मुलांचे असो किंवा मुलींचे असो…. हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये वाद होत असतात आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये होत. त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, असाच एक कॉलेजमधील तरुणींच्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. एका बॉयफ्रेंडवरून ही हाणामारी झाल्याचं बोललं जातंय.

प्रेम मिळवण्यासाठी काही लोक कोणत्याही हद्दीपर्यंत जाऊ शकतात. एखाद्या तरुणीवर बऱ्याच तरुणांचं प्रेम जडलं की ते त्या तरुणीला आपली गर्लफ्रेंड बनवण्यासाठी काय काय करतात हे तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण यात तरुणीही मागे नाहीत. एखादा तरुण आवडला तर त्याला बॉयफ्रेंड बनवण्यासाठी त्या कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात, हेच दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ एका इमारतीच्या खालील परिसर दिसून येत आहे. ज्यात अनेक तरुणी मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे, तर दुसरी लाथा घालतेय. तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. विशेष म्हणजे या मुली चक्क कॉलेजमध्ये भांडत आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. ‘मेरा बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो धोपतुंगी ना उसको’ हा आलिया भट्टचा डायलॉग आठवतो का? हीच आलिया भट्टचा अवतार या व्हिडीओमध्ये दिसून आला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “भावा बायकोला उचलून घ्यायचं म्हंजी खायचं काम नाय” ‘ही’ स्पर्धा पाहून पोट धरुन हसाल; VIDEO मध्ये पाहा शेवटी कोण जिंकलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ. भांडणाचे व्हिडीओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.