दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानाच्या जंगलात आपल्या कुटुंबासोबत मजा करत असलेल्या बेबी इम्पालाला पुढच्या क्षणी त्याचे काय होणार आहे याचा अंदाज आला नसावा. आफ्रिकेतील एका जातीचे अत्यंत वेगाने धावणारे काळवीट म्हणजे इम्पाला. आई इम्पालाने आपल्या मुलासाठी सुरक्षित जागा शोधली होती, परंतु खेळणाऱ्या तिच्या छोट्या मुलावर, बेबी इम्पालावर अचानक अजगराने हल्ला केला. एका झटक्यात तो अजगराच्या मजबूत पकडीत पूर्णपणे अडकला.

छोटा इम्पाला आणि अजगर यांच्यातील संघर्षाचा फायदा घेण्याच्या इच्छेने, एक तरस देखील तेथे पोहोचला आणि धीराने त्याच्या चान्सची वाट पाहू लागला. शिकारी आणि शिकारीच्या संघर्षाचा हा व्हिडीओ LatestKruger च्या Latest Sightings या यूट्यूब चॅनेलवरती प्रसारित झालेला आहे.

(हे ही वाचा: सहा सिंहीणीसोबत जंगलात बिनधास्तपणे फिरत होती ही मुलगी, धक्कादायक व्हिडीओ होतोय Viral)

कोण जिंकलं?

एस्केप सफारी कंपनी, माईक सदरलँड, एस्केप सफारी कंपनीचे मालक, मोम्बो कॅम्प, ओकावांगो डेल्टा, बोत्सवाना येथे जात असताना अजगर, एक बेबी इम्पाला आणि तरस यांच्यातील संघर्ष कॅमेऱ्यात कैद केला. इम्पालाची अनेक नवजात मुलं इकडे तिकडे फिरत होती. इम्पालाच्या कळपापासून काही अंतरावर एक तरस धावत होता. कदाचित तो शिकार करण्याची संधी शोधत होता, परंतु त्याने आपली शिकार पकडण्याआधीच एक अजगराने बाजी मारली. जोपर्यंत तो बेबी इम्पाला मरत नाही तोपर्यंत त्याने त्याला घट्ट पकडून ठेवलं होत.

(हे ही वाचा:समुद्रात पोहताना पाठून आला व्हेल मासा आणि…; बघा Viral Video)

तरसने अजगराच्या तावडीत अडकलेल्या बेबी इम्पालाला बाहेर काढण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. अजगराला घाबरवण्यासाठी त्याने त्याच्यावर हल्लाही केला. तो कित्येक मीटरपर्यंत ओढला गेला, पण अजगर आपली शिकार सोडण्याच्या मनस्थितीत नव्हता. तरस देखील हार मानणायला तयार न्हवता. त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले, त्यापुढे अखेर अजगराला हार मानावी लागली. तो बेबी इम्पालाला सोडून झाडांकडे गेला. मात्र, जाण्यापूर्वी त्याने त्याचा जीव घेतला.

(हे ही वाचा: रेल्वे रुळावर बाईक चालवत होता तरुण, समोरून आली ट्रेन आणि…; बघा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिथे उपस्थित सफारीवाल्यांना हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं सोपं नव्हतं. पण हा जंगलाचा मार्ग आहे. इथे कमी शक्तीशाली किंवा कमकुवत माणसाला नेहमी अधिक ताकदवानांसमोर पराभव स्वीकारावा लागतो.