Shocking viral video: सोशल मीडियावर रोज नव नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच शेजाऱ्यांसोबत नेहमीच उत्तम नातेसंबंध असावेत असे म्हटले जाते. कारण एखादी आपत्कालीन स्थिती ओढावल्यास आपण सर्वात प्रथम त्यांना बोलावू शकतो. अशातच गरजेचे आहे की, त्यांच्यासोबत नेहमीच उत्तम नातेसंबंध जपले पाहिजेत. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल, असे शेजारी नकोच रे देवा. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच संतापले आहेत.

शेजाऱ्यांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ आपण यापूर्वीही पाहिले आहेतच. छोट्या छोट्या कारणांवरुन शेजाऱ्यांमध्ये वाद होत असतात, आणि कधी कधी याच वादाचं रुपांतर हाणामारीतही होतं. असाच दोन शेजाऱ्यांमधील भांडणांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.पार्किंगच्या शुल्लक कारणावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पण या भांडणामध्ये एका तरुणीने शेजारच्या महिलेवर थेट त्यांचा कुत्राच सोडला. यामध्ये ती गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पार्किंगवरून शेजाऱ्यांमध्ये वाद

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन शेजारी आणि त्यांचे कुटुंबीय स्कूटी पार्क करण्यावरुन भांडत आहेत. एकीच म्हणणं आहे इथे गाडी लावू नको, तर दुसरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय गाडी तिथेच लावण्यावर ठाम आहेत. त्यामुळे दोघांमध्ये धक्काबुक्कीही सुरु आहे. या दरम्यान तिथे कुत्रा घेऊन उभ्या असणाऱ्या मुलीने थेट कुत्राच शेजारच्या महिलेवर सोडला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: संतापजनक! शिक्षिकेचा भर वर्गात भोजपुरी गाण्यावर अश्लील डान्स, उत्साहाच्या भरात नियंत्रण सुटलं अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही चांगलेच संतापले आहे. या महिलेला कुत्रा चावल्याची शक्यता व्हिडीओमधून वर्तवण्यात येत आहे.