Viral video: ट्रेन असो वा मेट्रो, लोक कधी कधी सीटसाठी भांडत असतात. त्याचे व्हिडीओही व्हायरल होतात. ऑफिसला जाण्यासाठी मेट्रोमध्ये चांगलीच गर्दी असते अशा वेळीही सीटसाठी भांडणे होतात. दिल्ली मेट्रोतील प्रवाशांचे भांडणाचे, हाणामारीचे अनेक व्हिडीओ आजवर समोर आले आहेत. दिल्ली मेट्रोतील महिलांच्या तसेच पुरुषांच्या हाणामारीचे व्हिडीओ तूफान व्हायरल होत असतात. आता आणखी एका वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. काही लोकतर बसण्याच्या जागेवर बॅग्स आणि इतर सामान ठेवतात आणि त्यामुळे इतर प्रवाशांशी भांडणे होतात. असाच एक भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका मेट्रोमध्ये दोन पुरुष भांडत आहेत. दिल्ली मेट्रोमध्ये हाणामारी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. मेट्रोचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. आतापर्यंत तुम्ही महिलांची भांडणं पाहिली असतील मात्र आता मेट्रोमध्ये दोन पुरुष एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळतंय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे प्रवासी चक्क खचाखच भरलेल्या मेट्रोमध्ये बॉक्सिंग करताना दिसतायेत. दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी सुरु असल्याचं दिसत आहे. हे दोघेही एकमेकांची कॉलर पकडून भांडण करत आहेत. दरम्यान काही प्रवासी या दोघांना थांबवण्याचा प्रयत्नही करत आहेत. मात्र दोघेही एकायला तयार नाहीत. दिल्ली मेट्रोमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भाऊ-बहिणीची ‘हिच’ खरी माया; बहिणीच्या पाठवणीवेळी ढसाढसा रडला भाऊ, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

हे भांडण पाहून मेट्रोमधील इतर प्रवासी सुद्धा थोडे घाबरलेले दिसतायेत. हा व्हिडीओ आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतेय, यांना आवरा आता अशा प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ @Arhantt_pvt एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.