वाघाच्या फोटोचे चित्रण करणारा एक ऑप्टिकल इल्युजन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. नेटीझन्सला या फोटोमधील दुसरा वाघ शोधायचं चॅलेंज दिलं जात आहे. तथापि, बहुतेक लोक दुसरा वाघ शोधण्यात अक्षम आहेत. ऑप्टिकल इल्युजन हा एक दृश्य भ्रम आहे. असे दिसते की आपले डोळे आपल्याला फसवत आहेत. तथापि, असे इल्युजन पाहून आपले डोळे कधीकधी गोंधळतात. शास्त्रज्ञांनुसार, इल्युजनचे कारण हे आहे आहे की आपले डोळे अशाच गोष्टी पाहतात ज्या आपण आधीही पाहिलेल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर तुम्ही या ऑप्टिकल इल्युजन मधील दुसरा लपलेला वाघ शोधू शकत असाल, तर तुम्ही स्वतःला टॉप १% मधील मध्ये स्थान मिळवून दिले आहे.हे व्हिज्युअल कोडे अधिक आव्हानात्मक आहे. पहिल्या दृष्टीक्षेपात ते शोधणे जवळजवळ अशक्य आहे. एकदा तुम्ही प्रयत्न करून बघा.

(हे ही वाचा: Viral Video: ‘या’ व्यक्तीने हातात एकत्र पकडले असंख्य जिवंत साप; व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांचा विश्वास बसेना!)

जर तुम्ही बारकाईने पाहिले तर, दुसरा लपलेला वाघ नाही तर ‘The Hidden Tiger’ (लपलेला वाघ) हे शब्द चतुराईने ऑप्टिकल इल्युजनमध्ये लपवले गेले आहेत. लोकांनी वाघाच्या आजूबाजूला खूप पाहिलं, पण वाघावरच ‘द हिडन टायगर’ लिहिलंय हे अजिबात लक्षात आलं नाही.

(हे ही वाचा: Viral Photo: ‘या’ फोटोतला बिबट्या तुम्ही शोधू शकता का? बघा प्रयत्न करून)

(हे ही वाचा: Video: मध्य प्रदेशात अस्वलाच्या हल्ल्यात नवरा-बायकोचा मृत्यू; मृतदेहावर बसून तोडले लचके)

ऑप्टिकल इल्युजन असलेली फोटो पाहिल्यानंतर, ते उत्तर शोधण्याचा जोरदार प्रयत्न सुरू करतात. लोकांनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करून लोकांना उत्तर विचारतात. या इल्युजनसाठी एक वेबसाइट देखील आहे, ज्यामध्ये दरवर्षी एक स्पर्धा आयोजित केली जाते. ‘बेस्ट इल्युजन ऑफ द इयर कॉन्टेस्ट’ या वेबसाइटनुसार, हा कार्यक्रम इल्युजन आणि काही संकल्पनेवर आधारित आहे. या वेबसाइटनुसार, व्हिज्युअल शास्त्रज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट आणि कलाकारांचा एक गट इल्युजनसह प्रतिमा तयार करतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two tigers are hidden in this optical illusion photo can you find another ttg
First published on: 09-06-2022 at 14:54 IST