Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या दोन वर्षाची चिमुकली भिंतीवर चढताना दिसत आहे. एवढ्या लहान वयात चिमुकलीचे शौर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेत की दोन वर्षाची चिमुकली कोणताही आधार न घेता एकटीच भिंत चढताना दिसत आहे. तोल जाऊन ती पडू नये, म्हणून एक जण तिला सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे. एवढ्या लहान वयात चिमुकलीमध्ये असलेले धैर्य पाहून कोणीही तिचा चाहता होईल. या चिमुकलीचे नाव हिंदवी असून तिचे व्हिडीओ तिचे वडील सोशल मीडियावर शेअर करत असतात.
mr.physique_sudam_patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” ये सह्याद्री….जा सांग माझ्या राजाला, या सह्याद्रीची सैर करणारी हिंदवी नावाची वाघीण आली आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्राच वाघीन” तर एका युजरने लिहिलेय, “शब्दच नाही बोलायला.. मोठी होऊन खूप पराक्रम गाजवणार वाघीन.. जय शिवराय” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुदाम सर माझी भाची कु. हिंदवी सुदाम पाटील हिला मी स्वतःहा Indian Army Self Defense शिकवणार आहे ती मोठी झाली की म्हणजे कोणी तिच्या अंगाला धक्का जरी लावला तर कोणते हाड मोडतील समजणार नाही, शब्द आहे मेजर चित्रांक जयहिंद चा… वंदे मातरम”