उत्तर-पश्चिम बंगळुरूच्या एका खासगी शाळेत एक विचित्र प्रकार घडला आहे. शाळेच्या आवारात काही बदमाशांनी ‘सॉरी’ रंगवले आहे. सुनकडकट्टे येथील शांतीधाम शाळेचे प्रवेशद्वार आणि त्यालगतच्या भिंतींवर ‘सॉरी’ लिहिलेले दिसत आहे. यामागे काही विद्यार्थ्यांचा हात असल्याचा संशय शाळा प्रशासनाला होता. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण दुचाकीवरून जाताना दिसत आहेत. डिलिव्हरी बॉयच्या वेषात दोघेही एक मोठी बॅग आणतात, जी सहसा फूड डिलिव्हरीसाठी वापरली जाते. यावेळी ते रंग काढून संपूर्ण आवारात ‘सॉरी’ लिहिताना दिसत होता. पश्चिम बेंगळुरूचे डीसीपी डॉ संजीव पाटील म्हणाले, ‘सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन दुचाकीस्वार दिसत होते. त्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.’

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कर्नाटक ओपन प्लेसेस (प्रिव्हेन्शन ऑफ डिसफिगरमेंट) कायद्यान्वये गुन्हा आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विटर अकाऊंटवर या घटनेची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करत घटनेची माहितीही दिली.

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

बसचालकाच्या मुलीची कौतुकास्पद कामगिरी; महिन्याभरात सर केले ८००० मीटर उंचीची चार शिखरे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटमध्ये लिहिले की, ‘कर्नाटकातील बेंगळुरू येथील सनकडकट्टे येथे एका खासगी शाळेच्या परिसरात आणि लगतच्या रस्त्यावर सॉरी लिहिले. या प्रकरणी पश्चिम बंगळुरूचे डीसीपी डॉ. संजीव पाटील यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीस्वार दोघेजण दिसत आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तूर्तास, या प्रकरणाची अधिक माहिती येणे बाकी आहे.