UK PM Rishi Sunak Pongal Video: अलीकडेच भारतात मकरसंक्रांत साजरी झाली. शिख बांधवांचा बैसाखी, दक्षिणेकडील राज्यातील पोंगल अशा दोन वेगळ्या रीतींनी व नावांनी हा सण साजरा होतो. भारतीय सणांची खासियत म्हणजे त्यांना कोणत्या क्षेत्राची मर्यादा नाही. जगभरात जिथे भारतीय तिथे सण हे समीकरण पाहायला मिळतच अलीकडेच पोंगल सणाच्या निमित्ताने युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सुद्धा जंगी सेलिब्रेशन केले. पंतप्रधानांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांसह लंडनमध्ये पोंगल साजरा करतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस, राजकीय नेते यांसह अनेक अधिकारी केळीच्या पानांवर पारंपारिक मेजवानी चाखताना दिसत आहेत .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडिओ अनेकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक यांचे कार्यालयातील कर्मचारी लंडनमधील 10 डाउनिंग स्ट्रीटवर त्यांनी आयोजित केलेल्या पोंगल लंचचा आनंद घेताना दिसत आहेत. कर्मचारी केळीच्या पानावर पारंपारिक मेजवानी खात होते आणि यावेळी त्यांना चक्क वेष्टी नेसलेले पुरुष मंडळी प्रेमाने जेवण वाढत होते.

या व्हिडिओमध्ये ऋषी सुनक यांनी भारतीयांसाठी खास संदेश सुद्धा पाठवला आहे. “मी या वीकेंडला थाई पोंगल साजरा करणाऱ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा देतो. मला माहित आहे की हा सण देशभरातील कुटुंबांसाठी किती महत्त्वाचा आहे. या थाई पोंगलच्या निमित्ताने जगभरातील प्रत्येकाला आरोग्य, आनंद आणि समृद्धी मिळो,” ऋषी सुनक व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.

ऋषी सुनक यांच्याकडून खास पोंगल मेजवानी

पोंगल हा एक कापणीचा सण आहे जो 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. पोंगलला थाई पोंगल असेही संबोधले जाते आणि संपूर्ण देशभरातील तमिळी लोक मुख्यतः साजरा करतात.

हे ही वाचा<< असा जॉब पाहिजे लेका! बाळाचं एक नाव सुचवायला ‘ती’ घेते ‘इतके’ लाख; कामाचा पॅटर्न तर बघा

दरम्यान, २४ ऑक्टोबरपासून ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान म्हणून घोषित झाले आहेत. सुनक हे प्रसिद्ध भारतीय बिझनेस टायकून नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांचे जावईबापू आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uk pm rishi sunak pongal celebration video goes viral london police officers face after eating rassam gone viral svs
First published on: 18-01-2023 at 12:06 IST