scorecardresearch

Premium

अनवाणी पायांनी गुडघ्यावर बसून बांगलादेशच्या पंतप्रधानांशी केला वार्तालाप; ब्रिटन पंतप्रधानांचा साधेपणा चर्चेत!

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक जी-२० परिषदेच्या निमित्ताने सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दिल्लीत दोन दिवस झालेल्या परिषदेच्या बैठकीनिमित्त ते पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यात आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह बातचीत करतानाचा त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे.

uk pm Rishi Sunaks Adorable Moment With Bangladesh PM Sheikh Hasina At G20
अनवाणी पायांनी गुडघ्यावर बसून बांगलादेशच्या पंतप्रधानांशी केली बातचीत, ब्रिटन पंतप्रधानांचा साधेपणा चर्चेत!

माणूस त्याच्या ताकदीने किंवा पैशाने नाही, तर त्याच्या निर्मळ स्वभावाने ओळखला जातो. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकदेखील अशा लोकांपैकी एक आहेत; ज्यांनी आपल्या स्वभावामुळे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. दिल्लीत झालेल्या दोन दिवसीय जी-२० परिषदेनिमित्त जगातील बलाढ्य देशांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षताही सहभागी होण्यास दिल्लीत आले आहेत. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येत स्टाईलची सर्वत्र विशेष चर्चा रंगतेय. मग ती पीएम मोदींची घेतलेली भेट असो किंवा पहाटे पत्नीसोबत अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेणे असो. आता ऋषी सुनक यांचा एक फोटो लोकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनत आहे; जो पाहून कोणीही त्यांची स्तुती करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही.

जी-२० परिषदेनंतर झालेल्या एका बैठकीदरम्यान ऋषी सुनक आणि बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांचा एक फोटो व्हायरल होत आहे; ज्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधान अनवाणी गुडघ्यावर बसून शेख हसीना यांच्याशी बोलत असल्याचे दिसत आहे.

Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान

शेख हसीना खुर्चीवर बसून बोलत असताना सुनक मात्र त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी आरामात गुडघ्यावर बसले आहेत. या साधेपणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. त्यामुळे दोघांचा हा फोटो आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी सुनक यांच्या कृतीचे कौतुक केले आहे. “एका देशाचे पंतप्रधान असूनही त्यांच्यात किंचितही अहंकार दिसला नाही”, असे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी, “हा खूप सुंदर फोटो असल्याचे म्हणत सुनक खूप सज्जन आहेत”, असे म्हटले आहे.

यापूर्वी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांचे अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी गेले असतानाच्या फोटोसह आणखी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी पूजा करीत मंदिराच्या स्थापत्य आणि इतिहासाबद्दल जाणून घेतले. हे दोघेही भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या स्वामीनारायण यांना समर्पित अक्षरधाम मंदिरात पोहोचले आणि स्वागत क्षेत्रापासून मुख्य मंदिर परिसरापर्यंत सुमारे १५० मीटर अनवाणी पायी चालत गेले. मंदिराची प्रदक्षिणा करताना सुनक यांनी पुजाऱ्यांशीही संवाद साधला. या वेळीही सुनक यांच्या साधेपणाचे खूप कौतुक झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uk pm rishi sunaks adorable moment with bangladesh pm sheikh hasina at g20 sjr

First published on: 11-09-2023 at 15:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×