Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानांपासून वृद्धापर्यंत डान्स करतानाचे व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काका काकू तुफान डान्स करताना दिसत आहे.काका काकूंचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.त्यांची ऊर्जा पाहून कोणीही अवाक् होईल.
हा व्हायरल व्हिडीओ एका कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये काका काकू जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.दिल तेरा आशिक या चित्रपटातील दिल तेरा आशिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. काका आणि काकूंच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही काका काकूंचे चाहते व्हाल.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की आयु्ष्य हे एकदाच मिळते त्यामुळे मनसोक्त जगायला पाहिजे. वयाचे बंधन न पाळता आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे.

हेही वाचा : पक्ष्यांसारखे सर्वोत्तम इंजिनिअर्स जगात कुठेही नाही! घरटं साकारतानाचा चिऊ ताईचा व्हिडीओ होतोय व्हायरल

veena_negi या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आयुष्याचा काही भरवसा नाही त्यामुळे भरभरुन जगायला पाहिजे” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “इन्स्टाग्रामवरील सर्वात सुंदर जोडी” आणखी एका युजरने लिहिलेय, “जीवनातील आनंद कसा घ्यायचा, हे काका काकूंकडून शिकले पाहिजे”