Viral video: असे अनेक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियाच्या समुद्रात तरंगताना दिसतात, जे तुम्हाला फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा पाहायला आवडतात. अनेकजण आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी मुद्दाम असे व्हिडिओ बनवतात, तर काही लोक इतरांच्या कृती कॅमेऱ्यात टिपतात. ज्यानंतर तो व्हायरल होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती लग्नात डान्स करताना दिसत आहे. हा डान्स पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

सोशल मीडियावर या काकांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण हे काका म्हणायला फक्त वयापुरतेच आहेत. त्यांची एनर्जी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशी आहे. माणूस वयाने मोठा झाला तरी त्याने मनाने कायम तरूण असलं पाहिजे, असं बोललं जातं. पण हे वाक्य काकांनी खरं करून दाखवलं आहे.

काकांच्या या डान्सने सोशल मीडिआवर धुमाकूळ घातला असून व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लग्न समारंभ असल्याचे दिसत आहे, ज्यामध्ये अनेक लोक दिसत आहेत. या लग्नात डीजेही आहे. यामध्ये दोन लोक डीजे फ्लोअरवर डान्स करताना दिसत आहेत. सुरुवातीला तो तुम्हाला एक सामान्य डान्स वाटेल, पण गाणे सुरू होताच काका असे काही नाचतात की तुम्हीही पाहतच रहाल. सारे लड़को की कर दो शादी बस एक को कुंवारा रखना या गाण्यावर यांनी काकांनी डान्स केला आहे.यावेळी त्यांच्या एकापेक्षा एक भारी स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून तुम्हीही लोट-पोट व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “सीमेवर गोळीबार म्हणजेच दिवाळी” जवानांनी व्यक्त केल्या भावना; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

लोकांनी केल्या मजेशीर कमेंट्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ”@basantfaizabadi” या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”सारे लड़को की कर दो शादी” असे लिहिण्यात आलेले आहे. सध्या लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि मजेदार कमेंट्सही येत आहेत. यूजर्स लिहित आहेत की “काकांनी लग्नात राडा केला” तर आणखी एका यूजरने लिहिले की “एवढ्या पाहुण्यांसमोर डान्स करायला हिम्मत लागते, तरुणाईही यांच्यासमोर लाजली असेल.”