Jackfruit side effects : फणसाची भाजी खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असते. पिकलेले फणसही लोक आवडीने खातात. यामध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण सध्या असा व्हिडीओ समोर आला आहे की, पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे फणस विकत घेताना खाताना शंभर वेळा विचार कराल.
मंडळी तुम्हीही जर बाजारातून फणस आणून खात असाल तर थांबा त्याआधी हा व्हिडीओ पाहा. कारण आधीसारखं आता फळे आणि भाज्या डोळे झाकून खाऊ अशी परिस्थिती राहिली नाहीये कारण प्रत्येक गोष्टीत आता भेसळ पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल असं झालंय तरी काय? तर सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये फणस विकणारे काय करतायत बघा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फणस विक्रेत्यांनी रस्त्यावर फणस विकण्यासाठी ठेवले आहेत. यावेळी जे फणस खराब झाले आहेत, ज्या फणसांवर काळे डाग आहेत.त्यावर काही लोक अक्षरश: केमिकल कलर लावत आहेत. जवळजवळ सगळ्याचं फणसांना हे लोक केमिकल लावत आहेत. यावेळी हे केमिकल फणसामध्ये जाऊन तेच आपल्या शरिरात जाणार. आणि याचे गंभीर परिणाम पुढे होणार. त्यामुळे बाजारातून यापुढे फणस, किंवा कोणतीही फळं विकत घेताना नीट तपासून घ्या. हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल माहिती मिळाली नाही मात्र हा गंभीर प्रकार समोर आला आहे.
बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. उद्या तुमच्याबरोबर हे घडलं, तर आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. हा व्हिडीओ sharifahmed5207
या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत.