Viral photo: मैत्रीच्या नात्याला प्रत्येकाच्याच आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. अनेकजण आपल्या जीवाभावाच्या मित्रासाठी काहीही करायला तयार असतात. यामध्ये, मित्राला त्याच्या गरजेच्या काळात पैसे देण्याच्या गोष्टीचाही समावेश होतो. मात्र, मदत म्हणून दिलेले हे पैसे आपल्याला प्रत्येकवेळी परत मिळतीलच अशी खात्री नसते. काहीजण हे पैसे परत करायला टाळाटाळ करतात. मैत्रीसाठी आपण बरेचदा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण या गोष्टी आपल्या मनात राहतातच. मात्र आता अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी एका व्यक्तीनं भन्नाट मार्ग शोधून काढलाय. उधारी घेतलेल्या व्यक्तीला अशी अद्दल घडवलीय की आता तो आयुष्यात पुन्हा कधीच उधारी ठेवणार नाही. या तरुणानं उधारी घेतलेल्या मित्राच्या चक्क घराबाहेरच बॅनर लावलाय. यावर त्यानं असं काही लिहलंय की उधारी घेणाऱ्याला चांगलीच अद्दल घडली आहे.
एखाद्या गरजूला मदत करणे किंवा कोणाकडे मदत मागणे या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही नुकसान नाही. पण बरेचदा असे घडते की, बराच वेळ झाला तरी ना पैसे परत मिळतात ना दुसऱ्याचे पैसे परत करता येतात. मात्र या तरुणानं थेट त्याच्या घराबाहेरच हा बॅनर लावलाय. फोटोमध्ये तुम्ही एक बॅनर पाहू शकता. या बॅनरवर उधारी घेतलेल्या व्यक्तीचं नाव आणि रक्कम लिहिलेली आहे. आणि लवकरात लवकर पैसे परत करावेत अशी विनंती केली आहे.
हा बॅनर शहरभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.
पाहा फोटो
सोशल मीडियावर हा व्हिडीओ kirankamlakartambe1968 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आता त्यांचा डिफेन्स : ‘मी तुला पैसे देणारच होतो. पण आता तू आमची इज्जत चव्हाट्यावर आणली ना – आता तर देणारच नाही. ” दुसरा म्हणतो, “मी पण बऱ्याच जणांना पैशाची मदत केली आहे पण कोणीच परत देत नाही आज देतो उद्या देतो असेच सांगतात पण देत नाही मी पण असेच बॅनर त्यांच्या गल्लीत लावू का??” तर आणखी एकानं, “मित्रा तुझ्या गल्लीत असा बॅनर लावायची वेळ आणू देऊ नको”