Viral video: नेहमीच बघायलं मिळालं की, लग्नात नवरदेवाचे मित्र मजा-मस्तीच्या मूडमध्ये असतात. ते काहीना काही गंमत करत असतात जेणेकरून लग्नात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू रहावं. कधी कधी तर मित्राच्या नव्या नवरीसोबतही ते गंमत करतात. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्न समारंभात मजा-मस्ती होतच राहते. नवरी-नवरदेवाचे मित्र, परिवारातील लोक वातावरण कूल ठेवण्यासाठी काहीना काही गंमत करत असतात. सोशल मीडियावर याचे कित्येक व्हिडीओ व्हायरलही होत असतात. यातील काही व्हिडीओंची जोरदार चर्चाही रंगते. लग्नात अनेकदा नवरी-नवरदेवाला अजब गिफ्टही मिळतात. हे गिफ्ट पाहून दोघेही हैराण होतात. सध्या असाच एक लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरदेवाच्या मित्रानं स्टेजवर नवरा-नवरीला भन्नाट गिफ्ट दिलं. ते गिफ्ट उघडून पाहिलं तर नवरा नवरीसह सर्वच शॉक झाले आहेत.

एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात नवरीला मित्रांनी दिलेल्या खास गिफ्टची चर्चा होत आहे. स्टेजवर नवरी-नवरदेव उभे आहेत आणि त्यांच्याजवळ त्यांचे मित्र आहेत. अशात एक मित्र नवरा नवरीला गिफ्ट देतो. इतकंच नाही तर तो तिथेच उघडायला सांगतो. त्यात जे दिसतं ते पाहून नवरी लाजते आणि नवरदेव हैराण होतो. आता तुम्ही म्हणाल असं काय गिफ्ट दिलंय?

तर या व्हिडीओध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरीला मित्रानं लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी चक्क विमानाचं तिकीट बूक करुन दिलं आहे. हैदराबाद ते मालदीव असं विमानाचं तिकीट या मित्रानं नवरा नवरीला लग्नात भेट दिलंय. आता लग्नानंतर नवरा नवरी या ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. हा व्हिडीओ पाहून आम्हाला पण असा मित्र हवा आहे अशा प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Marathi Wedding?  (@marathi_weddingz)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर marathi_weddingz नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “असा मित्र प्रत्येकाला मिळो” तर आणखी एकानं, भारीच अशी प्रतिक्रिया दिली आहे. लोकांनाही हा व्हिडीओ आवडला आहे लग्न सोहळ्यात गमती जमती होत असतात. त्याशिवाय अशा कार्यक्रमांमध्ये मजा येत नाही. अशा गमती करून वातावरण थोडं हलकं होतं. लोकांच्या आणि नवरी-नवरदेवाच्या चेहऱ्यावर हसूही फुलतं. तेवढाच त्यांचा ताण कमी होतो. या व्हिडीओतही तसंच काहीसं बघायला मिळतं.