देशांतर्गत किंवा देशाबाहेर प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला विमानतळावर प्रवेश करताना अनेक महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तुमच्या बॅगेत असलेलं सामान खूप गंभीर्याने तुम्हाला तपासावं लागतं. कारण विमानतळावर असलेल्या नियम व अटींचं उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं. पण युनायटेड स्टेटच्या एका विमानतळावर (Wisconsin’s Dane County) धक्कादाक प्रकार समोर आला. एका प्रवासी महिलेनं तिच्या बॅगेत घरगुती सामान नाही, तर चक्क पाळीव कुत्राच सोबत नेला. विमानतळावर असलेल्या X-Ray मशिनमध्ये त्या महिलेची बॅग तपासण्यात आली. तेव्हा त्या बॅगेत जीवंत कुत्रा असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनाही आश्चर्य वाटलं.

महिलेच्या बॅगेत सापडला कुत्रा, त्यानंतर…

एका अमेरिकन महिलेनं अनावधानाने विमातळावर जात असताना बॅगेत पाळीव कुत्रा ठेवला. विमानतळावर प्रवेश द्वाराजवळ असलेल्या सुरक्षा रक्षकांना एस्क रे मशिनमध्ये बॅगेची तपासणी केल्यानंतर बॅगेत कुत्रा असल्याचं दिसलं. हे पाहून विमानतळावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेबाबत टीएसए (TSA) च्या ट्विटर हॅंडलवर माहिती देण्यात आलीय. “एका बॅगेत अनावधानाने पाळीव कुत्रा ठेवण्यात आल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे तुम्ही प्रवास करताना विमातळावरील नियमांबाबत जाणून घ्या. तुमच्या बॅगेत पाळीव कुत्रा असल्यास त्याला प्रेवशद्वाराजवळ बाहेर काढा. त्यानंतर तुमची बॅग तपासणीसाठी मशिनमध्ये पाठवा”, असं ट्विट टीएसएनं केलं आहे.

नक्की वाचा – Video: तरुणाच्या अंगावर चढून साडी नेसलेल्या महिलेचा भन्नाट स्टंट, व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, ” नवऱ्याशिवाय…”

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच दुसऱ्या एका ट्विटमघध्ये टीसएनं म्हटलंय,” पाळीव प्राण्यांना प्रवासदरम्यान कसं घेऊन जायचं, याबाबत योग्य मार्गदर्शन केलं आहे. तुमच्या सोबत पाळीव प्राणी असल्यावर सर्वात आधी तुम्ही पर्यवेक्षकाला कळवा. त्यानंतर तुम्हाला ते प्राणी पळून जाण्याबाबत चिंता वाटणार नाही. कारण अशा परिस्थितीत विमानतळावर पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते.”