Viral Video : सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियाचा वापर नियमीत करत असाल तर तुम्हालादेखील हे व्हिडीओ पाहायला मिळत असतील. हरिद्वारच्या कुंजा बहादुरपूर येथील एका अनोख्या लग्न सोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर असाच तुफान व्हायरल होत आहे.

येथे नवरदेवाने आपल्याच लग्नात ब्राम्हणाचे काम केल्याचे पाहायला मिळाले. येथे नवरदेवच लग्नातील वेगवेगळ्या विधीसंबंधी मंत्र पठण करताना दिसत आहे. हे पाहून नवरी आणि कुटुंबातील इतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील विवेक कुमारने स्वतःचेच लग्न खास आणि अनोखे बनवले. हरिद्वारमधील कुंजा बहादूरपूर येथे झालेल्या या सोहळ्यात विवेकने स्वत: पुजारी बनून वैदिक मंत्रोच्चारांनी लग्नाचे विधी पूर्ण केले. विवेकने सांगितले की तो गेल्या अनेक दिवसांपासून हे मंत्रोच्चार आणि वैदिक परंपरेचे शिक्षण घेत आहे.

ही पोस्ट वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये विवेक नवरदेवाचे कपडे घातलेला दिसत असून तो स्वतः मंत्रोच्चार करत लग्नाचे विधी पार पाडताना दिसत आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले.

अनेकांकडून होतंय कौतूक

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी नवदाम्पत्याला आयुष्याच्या नवीन सुरूवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विवेक जे गुरुकूल कांगडी विद्यापीठात बी.फार्माचे शिक्षण घेत आहे. तसेच विवेकला वैदिक परंपरा आणि चालिरितींमध्ये रस होता. मीडिया रिपोर्टनुसार त्याचे कुटुंब आर्य समाजाशी संबंधित राहिलेले आहे. जे वैदिक संस्कृतीला प्रोत्साहन देत आले आहे. लहान असतानापासून तो या संस्थेत जात होता आणि मंत्रांचा अभ्यास करत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.