Man claims wife scares him: उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एका नवऱ्याने त्याच्या पत्नीपासून संरक्षण मागितलं आहे. त्याने असा दावा केला आहे की, त्याची पत्नी रात्रीच्या वेळी साप बनते आणि त्याला घाबरवते. नेमकं यामागे काय कारण आहे किंवा ही घटना कितपत सत्य आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

महमुदाबाद तहसीलामधील लोढासा गावातील मेराज इथे ४ ऑक्टोबर रोजी समाधान दिवस म्हणजेच सार्वजनिक तक्रार निवारण दिनादरम्यान सीतापूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या पुरूषाने आपली व्यथा मांडली आहे.

त्याने असा आरोप केला की, त्याची पत्नी नसीमुन मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे आणि ती रात्री नागीण असल्याचे भासवून त्याला फुसफुसत घाबरवते. त्याने असेही सांगितले की, त्याने स्थानिक पोलिसांची वारंवार मदत मागितली मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्याला जिल्हा प्रशासनाची मदत घ्यावी लागली असं त्याचं म्हणणं आहे.

यावेळी तक्रारीचे स्वरूप पाहता अधिकारीही आश्चर्यचकित झाले. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

याआधी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येही एक विचित्र घटना घडली होती. पत्नी विश्वासघात करत असल्याच्या संशयावरून पतीने तिचे नाक कापले होते.