PCS Swati Gupta: उत्तर प्रदेशच्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या महिला अधिकारी स्वाती गुप्ता सध्या त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहेत. स्वाती गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक लाईव्ह व्हिडीओ केला. चहाचा कप हाती घेऊन आपल्या चाहत्यांशी गप्पा मारत असताना त्यांनी असे काही विधान केले, ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी या विधानावर उलटसुलट प्रश्न विचारले आहेत. सोशल मीडियाच्या प्रभावाखाली फक्त तरूणाई नाही तर सरकारी अधिकारीही आल्याचे बोलले जात आहे.
मला भेटायचं असेल तर…
स्वाती गुप्ता या व्हिडीओमध्ये बोलतात की, ज्यांना मला भेटायचं आहे, त्यांनी फेसबुकवर माझे टॉप फॅन व्हावे. त्यासाठी ३० दिवस माझ्या पोस्ट रोज शेअर कराव्यात. जे लोक असे करतील त्यांना माझी भेट घेण्याची संधी मिळेल. त्या भेटीच्याही पोस्ट मी फेसबुकवर शेअर करेन.
२१ सप्टेंबर रोजी लखनौच्या पीसीएस अधिकारी स्वाती गुप्ता फेसबुक लाईव्हवर आल्या होत्या. यावेळी काही लोकांनी त्यांना विचारलं की, तुम्हाला भेटायचं असल्यास काय करावं लागेल? यावर उत्तर देत असताना गुप्ता यांनी वरील ऑफर दिली. “जे लोक ३० दिवस माझ्या पोस्ट शेअर करून टॉप फॅन बनतील. त्यांना मी स्वतः निमंत्रित करेन”, असंही गुप्ता म्हणाल्या.
सुंदरतेचं सांगितलं रहस्य
या फेसबुक लाईव्ह दरम्यान एका युजरनं स्वाती गुप्ता यांना त्यांच्या सुंदरतेचं रहस्यही विचारलं. त्यावर स्वाती गुप्ता म्हणाल्या, माझ्या सुंदरतेचं रहस्य म्हणजे माझे आई-बाबा आहेत. माझे वडील खूप हँडसम आहेत. तरूण असताना ते खूप सुंदर आणि गोरे होते. तसेच दिसायलाही ते उंच आणि देखणे होते. यामुळंच मी कदाचित सुंदर असेल.
स्वाती गुप्ता यांचा हा लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारी अधिकारी असताना अशाप्रकारे प्रसिद्धीपासून लांब राहायला हवं, असे अनेकजण बोलत आहेत.
सोशल मीडियावर सक्रिय
पीसीएस स्वाती गुप्ता या सोशल मीडियावर चांगल्या सक्रिय आहेत. फेसबुकवर त्यांचे २८ हजार तर इन्स्टाग्रामवर २ लाख ५४ हजार फॉलोअर्स आहेत. २०१७ साली त्यांची पीसीएस अधिकार म्हणून निवड झाली. सध्या त्या पंचायती राज विभागात तैनात आहेत.