Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे, तर काही व्हिडीओ असे असतात जे विचार करायला भाग पाडतात. शिवाय भांडणांचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे छोट्या शुल्लक अशा कारणांवरुन लोकांना राग येतो आणि भांडायला सुरुवात करतात. रागाच्या भरात कधी कोण काय करेल सांगता येत नाही. रागामध्ये लोकांना आजूबाजूच्या परिस्थितीचे देखील भान राहत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका मंदिरात पुजाऱ्याला भाविकांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचं कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिराच्या परिसरात भाविकांनी एका मंदिरातील पुजाऱ्याला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. फुटेजनुसार, १५ जून रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास पुजारी प्रसाद देत असताना ही घटना घडली.यादरम्यान, एका भाविकाने प्रसादातून दोन अतिरिक्त लाडू घेतल्याबद्दल पुजाऱ्यावर हात उचलला. शाब्दिक बाचाबाची वाढली आणि ती हिंसक झाली. भाविकांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि पुजाऱ्याला बोलूही दिले नाही.६५ सेकंदांच्या या क्लिपमध्ये एका पुरूषाने पुजाऱ्याला धरले आहे तर दुसऱ्या पुरूषाने त्याला मारहाण केली आहे. काही महिला पुरूषांना हस्तक्षेप करून पुजाऱ्यावर हल्ला करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, परंतु त्यांचे कुणीही ऐकत नाहीये.

पाहा व्हिडीओ

मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट एक्सवरील व्हायरल व्हिडिओवर फतेहपूर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात, खागा पोलिस स्टेशनला मिळालेल्या लेखी माहितीच्या आधारे, संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून नियमांनुसार आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे,” असे पोलिसांनी एक्सवर सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “देवाला तरी घाबरा रे…” तर आणखी एकानं, “आपण कुठे आहोत याचंही तरी भान ठेवलं पाहिजे पण लोकांना फक्त आपला स्वार्थ दिसतो.”