Son Surprised Father With UPSC 2023 Result In His Office : कोणत्याही आई-वडिलांना आपली मुलं आयुष्यात यशस्वी होतायत हे पाहून आनंद होत असतो. ज्यांना लहानाचं मोठं केलं, तीच मुलं एकदिवस आयपीएस, आयएएस अधिकारी होतात हे पाहताना आई-वडिलांचा ऊर किती अभिमानानं भरून येत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नुसत्या विचारानंच अंगावर काटा उभा राहिला ना? अशाच प्रकारे एका मुलानं UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच प्रथम आपल्या वडिलांना तो निकाल सांगण्याचा विचार केला आणि त्यानं थेट वडिलांचं ऑफिस गाठलं. जेवणावर बसलेल्या वडिलांना निकाल सांगताच ते उठले आणि त्यांनी मुलाला कडकडून मिठी मारली. या प्रसंगातील वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अगदी काळजाला भिडणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वडील आपल्या ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेत मित्रांसह बसून जेवत असतात. तेवढ्यात त्यांचा मुलगा त्यांना एक खास गोष्ट सांगण्यासाठी म्हणून तिथे पोहोचतो. त्याल पाहून वडीलही काही क्षण गोंधळात पडतात. त्यावेळी मुलगा त्यांना आपण यूपीएससी परीक्षा पास झाल्याची माहिती देतो. ते ऐकल्यावर वडील एकदम हर्षभरीत होतात आणि त्या आनंदातच ते जेवण सोडून मुलाचे घट्ट मिठी मारून अभिनंदन करतात. स्वाभाविकत: तेथे असलेले वडिलांचे मित्रदेखील त्याचे अभिनंदन करीत कौतुक करतात.

Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
Uttarakhand accident video
उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?
orange ice cream dirty unhygienic making video kanpur ice cream factory dirty video viral
उन्हाळ्यात १० रुपयांची लोकल ब्रँडची आइस्क्रीम आवडीने खाणाऱ्यांनो फॅक्टरीतील ‘हा’ VIDEO पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Pavitra Jayaram Dies In a Car Accident
प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी
Passenger shares video of Kashi Express’s overcrowded coach.
” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल

मुलगा जसा वडिलांच्या ऑफिसमध्ये शिरतो तसे वडील त्याला विचारतात, क्या हुआ? त्यावर तो मुलगा म्हणतो, कोणी मोठा अधिकारी आल्यावर उभं राहायचं असतं ना? मुलाचे ते शब्द कानावर पडताच वडिलांना लक्षात येते की, आपला मुलगा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला असून, तो आता एक मोठा अधिकारी होणार आहे. ही बातमी ऐकल्यावर वडील जेवण बाजूला सारून, आधी मुलाला कडकडून मिठी मारतात.

@kshitijgurbel नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावेळी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या वडिलांना अशा प्रकारे माझा यूपीएससी सीएसई २०२३ चा निकाल सांगितला. तेव्हा वडील ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसह दुपारचे जेवण करीत होते. परंतु, हा दिवस पाहण्यासाठी दोन वर्षं फार कष्ट उपसावे लागले. मी माझे आई-वडील आणि बहीण यांचा कायम ऋणी राहीन. कारण- त्यांनी माझ्या प्रवासात मला कायम साथ दिली आहे.

अतिशय भावनिक करणारा हा व्हिडीओ पाहून, युजर्सचे डोळेही पाणावले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये रडण्याच्या इमोजी शेअर करीत या तरुणाचे अभिनंदन केले आहे. तर, अनेकांनी मुलहा असावा तर असा, अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्या आहेत.