‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामुळे जगभरात प्रचंड लोकप्रिय झालेल्या बेअर ग्रिल्समुळे जंगलात हरवलेली आई आणि तिचा मुलगा दहा दिवस जिवंत राहिला. पृथ्वीवरील काही अतिदुर्गम ठिकाणी एखादी व्यक्ती सापडली तर कोणत्याही साधनांविना ती व्यक्ती कशी सुखरूप राहू शकते, त्यासाठी कोणत्या क्लृप्त्या लढवाव्या हे सारं बेअर ग्रिल्सने आपल्या कार्यक्रमातून जगाला दाखवलं आणि याच ट्रिक्स वापरून मिशेल पिटमॅन आणि तिचा ९ वर्षांचा मुलगा डायलन खडतर परिस्थितीतही जिवंत राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : भारतीय वंशाच्या मुलांची प्रेरणादायक कामगिरी, दीड वर्षांत झाला कोट्यधीश

२ ऑक्टोबरला हे दोघंही हंटर व्हॅलीमध्ये फिरायला गेले होते पण परतीचा रस्ता मात्र ते विरसले. अशावेळी बेअर ग्रिल्सने आपल्या मालिकेत दाखवलेल्या वेगवेगळे युक्त्या वापरून घनदाट जंगलात त्यांनी स्वत:ला जिवंत ठेवलं. पाणी उपलब्ध नसल्याने जंगलातील पानांच्या रसापासून त्यांनी शरीरातील पाण्याच्या पातळीचं संतुलन राखलं. डायलनला बेअरची मालिका आवडायची त्याने दाखवलेल्या सर्व युक्त्या छोट्या डायलनने लक्षात ठेवल्या आणि जंगलात त्या वापरल्या. जर जिवंत राहण्याच्या या युक्त्या आम्हाला माहिती नसत्या तर आमचा कधीच जीव गेला असता अशी प्रतिक्रिया मिशेलने दिली.

आपल्या शूजचा वापर दोघांनीही पाणी साठवण्यासाठी केला. तब्बल दहा दिवसानंतर त्यांना शोधण्यात आलं. ड्रिहायड्रेशनमुळे या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

Viral Video : अन् कोहलीला मैदानातच भांगडा करण्याचा मोह अनावर

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Using bear grylls survival tips australian mother and son survive 10 days in the wild
First published on: 17-10-2017 at 11:54 IST