एकतर्फी प्रेमाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून एका नराधमाने तरुणीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन फेकत तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेह घेऊन पळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधील गौरव नावाचा विवाहित व्यक्ती होशियापूरमधील शितल नावाच्या २२ वर्षीय मुलीवरती एकतर्फी प्रेम करायचा.

तो शितलचा सतत पाठलाग करुन तिला त्रास द्यायचा, गौरवच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या घरच्यांनी त्याच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देखील केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीवरती कोणती कडक कारवाई केली नव्हती. दरम्यान, नराधम आरोपी शितल नोकरी करत असलेल्या इंशुरन्स कंपनीमध्ये पाठलाग करत गेला. त्यावेळी त्याने शितलसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला.

आणखी वाचा- मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आयबी ऑफिसरला शेजाऱ्याने कारखाली चिरडलं; पोलिस तपासात धक्कादायक कारण आलं समोर

मात्र, शितलने त्याला स्पष्ट नकार देत त्याचा प्रेम प्रस्ताव धुडकावून लावल्यामुळे रागवलेल्या नराधम आरोपीने तिला त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं. शिवाय इमारतीच्या खाली येऊन त्याने शितलचा मृतदेह रुग्णालयात घेऊन जायचं सांगत तो फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी आले त्यावेळी स्थानिकांसह घरच्या लोकांनी पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

आणखी वाचा- भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकच्या चाकात अडकलं वानर; धक्कादायक व्हिडीओ पाहून अंगावर येईल शहारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पोलिसांनी शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये या मृतदेहाबद्दल चौकशी केली असता असा मृतदेह कोणत्याच रुग्णालयात नसल्याचं पोलिसांना समजताच त्यांनी आरोपीचा मोबाईल ट्रेस केला आणि मेरठ कंकरखेडा येथून रुग्णवाहिकेसह आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी शितलचा मृतदेह जाळण्यासाठी घेऊन जात होता असंही पोलिसांनी सांगितलं. कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन आरोपीलाअटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र, पोलिसांनी आरोपीवरती याआधीच कठोर कारवाई केली असती तर कदाचित शितलचा जीव वाचला असता अशी खंत शितलच्या भावाने व्यक्त केली. तर या घटनेमुळे पुन्हा एका उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.