bihar girl fall in love with pratapgrah boy while playing online ludo got married in temple | Loksatta

ऐकावे ते नवलच! ऑनलाइन लुडो खेळताना जुळले प्रेम; मुलगी लग्नासाठी थेट पोहोचली यूपीमध्ये

लुडो खेळताना एक तरुण आणि तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर तरुणी लग्नासाठी थेट यूपीमध्ये पोहोचली. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

ऐकावे ते नवलच! ऑनलाइन लुडो खेळताना जुळले प्रेम; मुलगी लग्नासाठी थेट पोहोचली यूपीमध्ये
फोटो(प्रातिनिधिक)

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये एक अनोखा प्रकार समोर आला आहे. येथे ऑनलाइन लुडो खेळत असताना बिहारमधील एक तरुणी आणि यूपीतील तरुण प्रेमात पडले. सोमवारी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोघांनी माँ बेल्हा देवी मंदिरात लग्न केले. बिहारी छोरी आणि यूपीच्या छोरे यांची ही अनोखी प्रेमकहाणी संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?

गोपालापूर शहराजवळील येथे राहणारा एक तरुण ऑनलाइन लुडो खेळत असताना बिहारच्या मुझफ्फरपूर येथील एका तरुणीच्या संपर्कात आला. दोघांमधील संवाद हळूहळू वाढू लागला. त्यानंतर दोघांची एकमेकांशी मैत्री झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पढले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिहारमधील मुझफ्फरपूर येथून ही तरुणी उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे एकटीच आली होती. सोमवारी दुपारी ती तरुणासोबत बेल्हा देवी येथे पोहोचली.

( हे ही वाचा: दिवाळीपूर्वी शनिदेव ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकवणार; मिळेल बक्कळ संपत्तीसह नशिबाची मजबूत साथ)

नवरात्रीची अष्टमी आणि साप्ताहिक जत्रेच्या दिवशी बेल्हा देवी धाममध्ये गर्दी होत असल्याने मंदिर परिसरात गोंधळ उडाला होता. मंदिराच्या आवारात लग्न झालेल्या तरुण-तरुणीसोबत कोणीही नातेवाईक किंवा मंडळी नसल्यामुळे लोकांनी त्यांची विचारपूस सुरू केली. यादरम्यान तरुण आणि तरुणीचा धर्म वेगळा असल्याचे समोर आले. यावरून वाद सुरू झाला. यावर मंदिर परिसरात उपस्थित असलेले पोलिसही पोहोचले.

आईची हरकत नसल्याने लग्नाला मंजुरी

पोलिसांनी मुलीकडे कुटुंबीयांचा फोन नंबर मागितला. पोलिसांनी फोन केल्यावर त्याची आई बोलली. आपल्या मुलीचे येथील मंदिरात लग्न होत असल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर आईने कोणतीही हरकत घेतली नाही. आपली मुलगी प्रौढ असून तिचे प्रतापगड येथील तरुणावर प्रेम असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. ती त्याच्यासोबत प्रतापगडला गेली आहे. महिलेच्या या उत्तराने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण वेगवेगळ्या धर्माचे असूनही मुलीच्या आनंदासाठी महिलेने लग्नाला परवानगी दिली. अशा स्थितीत तेथे उपस्थित लोकांनीही लग्नाच्या मिरवणुका बनून जोडप्याला आशीर्वाद दिले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIRAL : सरकारी शाळेची दुरवस्था पाहून ग्रामसभेत मुख्याध्यापकांचा रोष

संबंधित बातम्या

कोकणातल्या रस्त्यावर नक्की चाललंय तरी काय? ड्रायव्हर नसतानाही गोल गोल का फिरतेय ‘ही’ रिक्षा? पाहा Video
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
भूक लागल्याचे सांगण्यासाठी मांजरीने काय केले पाहा; Viral Video पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Optical illusion Photo: अशा फोटोंमुळेच बुद्धीला कस लागतो, मग शोधा पाहू काळ्या-सफेद रेषांमध्ये लपलेला इंग्रजी शब्द
विश्लेषण : ‘कांतारा’ चित्रपटातील ‘वराह रुपम’ गाण्यावरचे आक्षेप कोर्टाने फेटाळले; बंदी उठवण्याचे आदेश; नेमका काय होता वाद?
विश्लेषण: AIIMS चा सर्व्हर हॅक करून मागितली २०० कोटींची खंडणी, रॅन्समवेअर कुणावरही करू शकतो हल्ला! कसा कराल बचाव?
मुंबईत जमावबंदीच्या अफवा, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
Shraddha murder case : आरोपी आफताबला तिहारमध्ये वाचायची आहेत पुस्तके; तुरुंग प्रशासनाकडे केली मागणी