गुवाहाटीतील बारसपरा मैदानात रविवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचा पहिला सामना होणार होता. पण, पावसामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांदरम्यान होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतला रविवारचा हा पहिला सामना होता. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मात्र नंतर पाऊस सुरू झाला. हा सामना पूर्ण व्हावा यासाठी बीसीसीआयने खेळपट्टी कोरडी करण्याचा खूप प्रयत्न केला. खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क ईस्त्री ,व्हॅक्यूम क्लिनर, हेअर ड्रायर यांसारख्या उपकरणांची मदत घेण्यात आली. खेळपट्टी कोरडी करण्याची ही अनोखी पद्धत पाहून लोकं मात्र प्रचंड हैराण झाले. यामुळेच ट्विटरवर युजर ईस्त्री आणि हेअर ड्रायर खेळपट्टी कोरडे करतानाचे फोटो शेअर करुन बीसीसीआयच्या जुगाडची खिल्ली उडवत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जुगाड –


हे वर्ष २०२० आहे का?


आधुनिक उपकरणं –


खेळपट्टी नक्कीच कोरडी होईल –


जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड –

गुवाहाटीमध्ये प्रेक्षक सामना सुरू होण्याची अखेरपर्यंत प्रतीक्षा करत होते. पण पावसामुळे त्यांची निराशा झाली. आता तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सात जानेवारी रोजी इंदुरमध्ये होणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vacuum cleaners hair dryers electric irons used to make pitch dry ind vs sl first t20i sas
First published on: 06-01-2020 at 12:50 IST