अनेकदा वजन जास्त असलेल्या व्यक्ती लोकांच्या थट्टेचा विषय बनलेल्या असतात. त्यांचं वजन, खाण्याच्या सवयी यावर सर्रास टिंगल केली जाते. वडोदराच्या नैनेश बाबतीतही असंच व्हायचं. त्याचं वजन होतं १३६ किलो. तेव्हा अतिलठ्ठपणामुळे आधी तो सगळ्यांच्या चेष्टेचा विषय ठरायचा. अनेकदा त्याचे कुटुंबिय त्याला कार्यक्रमांपासून दूर ठेवायचे. नैनेश तिथे आला आणि त्याच्या लठ्ठपणामुळे त्याची कोणी खिल्ली उडवली तर.. याची भीती त्याच्या आई वडिलांना वाटायची. पण जर आता कोणी नैनेशला पाहिलं तर कोणे एकेकाळी त्याचं वजन १३६ किलो होते हे कोणालाही सांगून खरं वाटणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : आयसिसच्या दहशतवाद्याने पळून जाण्यासाठी मुर्खपणाचा कळस गाठला

नैनेशने गेल्या काही महिन्यात मेहनत करून आपलं वजन अर्ध्याहूही अधिक घटवलं. नैनेशचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे अनेकांना प्रेरणादायी ठरत आहेत. योग्य आहार, व्यायाम, चालणं अशा सगळ्या गोष्टींची सांगड घालून त्याने ७२ किलो वजन कमी केलंय. नैनेश सांगतो मी आठवड्यातून पाच दिवस ४० मिनिटे चालतो आणि दरवेळी ही वेळ आणखी वाढवण्याचा प्रयत्न करतो. शिवाय आठवड्याभरात चिझ, तेलकट पदार्थ किंवा ज्याने वजन वाढेल अशा गोष्टी खाणं नैनेश टाळतो, पण नैनेशचं एक सिक्रेट देखील आहे. अनेकदा वजन कमी करायचं म्हणजे तेलकट पदार्थ, गोडधोड पदार्थ तसेच चिझपासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांना कायमची सोडचिठ्ठी द्यावी लागते. पण नैनेश मात्र असं काही केलं नाही, हे पदार्थ खाण्याची इच्छा त्यालाही होते आणि जेव्हा त्याला अशी इच्छा होते तेव्हा या सर्व पदार्थांची यादी तो एका कागदावर लिहून ठेवतो. रविवार आला की व्यायामाला सुट्टी देतो आणि या एकादिवसात तो आपली इतर पदार्थ खाण्याची इच्छा पूर्ण करतो.

वाचा : मंदिरातील पूजेसाठी कॅनडाचे पंतप्रधान ‘देसी लूक’मध्ये

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vadodara man nainesh chainani loss weight 136 kgs to 64 kgs
First published on: 24-07-2017 at 12:20 IST