Viral Video: सोशल मीडियावर अनेक निरनिराळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही मजेशीर, भावनिक, आश्चर्यकारक, धक्कादायक असतात. यापैकी कधी कोणता व्हिडीओ किंवा फोटो चर्चेत येईल हे सांगता येत नाही. तर असाच एक अनोखा व्हिडीओ आज सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पुण्यातील एका रस्त्यावर एका तरुणाला चक्क १०० पेक्षा जास्त खिळे पडलेले दिसून आले आहेत.
व्हायरल व्हिडीओ पुण्याचा आहे. एक्स युजर हातात खिळे घेऊन व्हिडीओत दाखवताना दिसत आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय ते जुना बाजार चौकदरम्यान रस्त्यावर १०० हून अधिक खिळे जमा करण्यात आले आहेत. इतर वाहनांचे टायर पंक्चर होऊ नये व वाहनचालकांना कोणतीही इजा होऊ नये यासाठी आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी रस्त्यावर पडलेले खिळे गोळा करताना दिसून आले आहेत. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.
हेही वाचा…गोव्यात फिरणाऱ्या ‘त्या’ दोन तरुणींचा VIDEO व्हायरल; दुचाकीवर विरुद्ध दिशेला बसल्या अन्… पाहा पोस्ट
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रस्त्यावर पडलेल्या खिळ्यांना पाहून रहिवासी त्यांची वाहने वारंवार पंक्चर होण्याचे अनुभव सांगताना दिसत आहेत. तसेच त्यांची वाहने मुद्दाम पंक्चर करण्यासाठी ही योजना आखण्यात आली असावी, असा अंदाज रहिवासी लावताना दिसत आहेत. तसेच रहिवाश्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे आणि जबाबदार लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Rohitsharma0019 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जिल्हाधिकारी कार्यालय ते जुना बाजार चौकदरम्यान वाहन पंक्चर करण्यासाठी १०० हून अधिक खिळे जमा करण्यात आले”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच रस्त्यांवरील खिळ्यांची वाढती संख्या ही पुणेकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे”; अशा अनेक कमेंट नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.