Video 14 Buffaloes Attack Single Lion King Jumps in Air Herd Angry Reaction Will Shock You Viral Video | Loksatta

Video: १४ म्हशींचा सिंहावर हल्लाबोल; सिंहाने हवेत उडी मारताच म्हैस अजून चिडली, असं काही केलं की..

Shocking Video: सिंहाच्या दिशेने त्या म्हशी अशी वेगवान धाव घेतात की सिंह पार हादरून जातो व पळू लागतो. या चेंगराचेंगरीत सिंह…

Video 14 Buffaloes Attack Single Lion King Jumps in Air Herd Angry Reaction Will Shock You Viral Video
Video: १४ म्हशींचा सिंहावर हल्लाबोल; सिंहाने हवेत उडी मारताच म्हैस अजून चिडली, असं काही केलं की.. (फोटो: इंस्टाग्राम)

Shocking Video: सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ कधी कधी इतके भयंकर असतात की आपल्याला विश्वास ठेवणेही शक्य होत नाही. विशेषतः प्राण्यांचे व्हिडीओ तर अक्षरशः थरकाप उडवतात. प्राण्यांच्या लढाईत आपल्याला अपेक्षित असणारे निकाल कधीच लागत नाहीत. आता तुम्हीच सांगा, म्हैस मोठी की सिंह? अर्थात सिंह, बरोबर? पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहाल तर आता जंगलाच्या राजाचा मान बदलण्याची वेळ आली आहे असेच तुम्हीही म्हणाल. यामध्ये एका सिंहाला म्हशींच्या कळपाने अक्षरशः पायदळी तुडवल्याचे दिसत आहे. केलब्रिक या फोटोग्राफरने ही अविश्वसनीय लढाई आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. तो पर्यटकांच्या एका गटासह जंगल सफरीवर गेला असताना ही लढाई पाहायला मिळाल्याचे कॅप्शनमध्ये म्हंटले आहे.

तुम्ही व्हिडीओमध्ये बघू शकता की, सिंह काहीसा वयस्कर असल्याचे दिसत आहे, साहजिकच त्याची शक्ती थोडी कमी झाली असणार, हेच बघून या म्हशींनी आपला डाव साधला. खरंतर यात म्हशींची चूक नाही कारण सुरुवातीला हा सिंहच म्हशींवर हल्ला करताना दिसत आहे. पण म्हणतात ना एकीच्या बळापुढे भलेभले झुकतात तशाच या सिंहाचा हल्ला म्हशी उलटवून लावतात. इतकंच नव्हे तर सिंहाच्या दिशेने त्या म्हशी अशी वेगवान धाव घेतात की सिंह पार हादरून जातो व पळू लागतो. या चेंगराचेंगरीत सिंह असा अडकतो की त्याला बाहेर पडणंच शक्य होत नाही.

तब्बल १५ मिनिटांनंतर अन्य सिंह या मित्राच्या मदतीसाठी धावून आले आणि मग मात्र म्हशींचे धाबे दणाणले व त्या पळ काढू लागल्या. दुर्दैवाने या हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर सिंहाचे निधन झाले आहे.

हे ही वाचा<< Video: वाह्ह दादा वाह्ह! मगरीला धरायला टीशर्ट नेलं; मगरीनेही शांतपणे हात उचलला अन झटक्यात…

हे ही वाचा<< What? वरुण धवनचा ‘भेडिया’, खऱ्या आयुष्यात जगतोय ‘हा’ मुलगा; या विचित्र आजारात अंगभर फक्त…

दरम्यान, हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला तब्बल १.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर वापरकर्ते ही हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत. अनेकांना याचे आश्चर्य वाटते की म्हशी या काही मांसाहारी नाहीत, अर्थात त्या सिंहाला खाणार नाहीत मग तरीही सिंहाला मारण्यासाठी त्या इतका आटापिटा का करत आहेत. खरंतर ही सर्व निसर्गाची किमया आहे, पण तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 10:10 IST
Next Story
..तर आफताबने श्रद्धाचे ३६-३७ तुकडे केले असते; ‘हा’ Viral Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल