सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) गोळीबार झाला. ही घटना घडली तेव्हा सलमानसह इतर सर्वजण घरातच होते, पण कोणीही जखमी झालेलं नाही. सलमानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तपास करत आहेत.

झोन ९ चे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन म्हणाले, “दोघे अज्ञात दुचाकीवरून आले आणि त्यांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोळीबार केला आणि ते पळून गेले. चार ते पाच राऊंड गोळीबार करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही १५ पोलीस पथकं तयार केली आहेत. सर्व बाजूंनी आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. आम्ही हल्लेखोरांना लवकरच पकडू.”

Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
News About Salman Khan
Salman Khan Threat : सलमान खानला धमकी देणाऱ्या तरुणाला ‘या’ राज्यातून करण्यात आली अटक, ५ कोटींची मागितली खंडणी
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
uke send bomb threats email regarding Jagdish Uikes terrorism book publication
विमानात बॉम्ब असल्याचे फोन, तो का करायचा ? कारण आहे धक्कादायक
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
Amit Shah claim regarding agitations and prices of agricultural commodities
कॅनडाच्या अमित शाह यांच्यावरील आरोपाला भारत सरकारचं प्रत्युत्तर; म्हणाले, “आंतरराष्ट्रीय पातळीवर…”
Two terrorist organizations Jaish e Mohammed and SJF plan to bomb airports railway stations and temples
विमानात बॉम्बची धमकी देणारा …, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल काय म्हणाले जाणून घ्या

‘इंडियन एक्सप्रेस’ च्या वृत्तानुसार, एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजवरून असं दिसून येतंय की गोळीबार करणाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीवर नाही तर हवेत गोळीबार केला. हा गोळीबार त्यांनी हल्ला करण्यासाठी नाही तर दहशत निर्माण करण्यासाठी आणि मेसेज देण्यासाठी केला होता.

गोळीबारानंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर सोडणार? मोठी माहिती आली समोर

या प्रकरणात सहभागी असलेले दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नंतर संध्याकाळी पोलिसांनी एका संशयिताची ओळख पटवली आहे. त्याचं नाव विशाल उर्फ कालू असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगमधील शूटर आहे. विसाल गुडगावचा रहिवासी आहे. तो राजस्थानमधील गोदारा नावाच्या गुंडासाठी काम करतो. मूसवालासह अनेक हाय-प्रोफाइल खूनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचं बोललं जातं, तो कॅनडामध्ये राहतो.

सलमानच्या घराबाहेर गोळीबार, वडील सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना फक्त…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आणि दुचाकी चालवणारा त्याचा सहकारी दोघांनी गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या घराची रेकी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेत वापरलेली दुचाकी नंतर एक किलोमीटर अंतरावर एका चर्चजवळ आढळली. दुचाकीची नोंदणी पनवेल येथील एका रहिवाशाच्या नावावर आहे. ही दुचाकी चोरीला गेली होती की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवलं असून त्यानुसार, दुचाकी सोडून दिल्यावर ते दोघे संशयित काही वेळ चालत गेले आणि मग त्यांनी रिक्षा घेतली आणि ते वांद्रे रेल्वे स्थानकावर पोहोचले, तिथून ते उत्तरेकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये चढले. दोघांनी जाता जाता कपडे बदलले असावेत, असा पोलिसांना संशय आहे.

वांद्रे पोलिसांनी आयपीसी कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी हा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.