Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. येथे अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. कोणी डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करतात तर कोणी म्हणतानाचे व्हिडीओ शेअर करतात. कोणी व्हिडीओद्वारे जुगाड किंवा हटके ट्रिक सांगतात तर कोणी स्टंट करून दाखवतात. तुम्ही आजवर असे अनेक थक्क करणारे किंवा पोट धरून हसवणारे व्हिडीओ पाहिले असेल. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकीत करेल. या व्हिडीओमध्ये एक स्कूटी चक्क इमारतीला लटकलेली दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक इमारत दिसेल. या इमारतीच्या एका बाजूला वर स्कूटी लटकलेली दिसत आहे. हे दृश्य पाहून कोणीही अवाक् होईल. अनेकांना प्रश्न पडला असेल की ही की स्कूटी या इमारतीला कशी लटकलेली असेल? व्हिडीओत तुम्हाला काही लोक त्या इमारतीखाली जमलेले दिसेल. नेमके काय घडले व कसे घडले, याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ
ghar ke kalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही स्कूटी तिथे पोहचली कशी?” तर एका युजरने लिहिलेय, “हे कसं शक्य आहे?” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा आम्हाला सीसीटिव्ही फूटेज हवा, हा चमत्कार कसा घडला, हे बघायचं” एक युजर लिहितो, “मला खूप प्रश्न पडले आहे?” तर एक युजर लिहितो, “वायर मध्ये आली नाहीतर स्कूटी थेट चंद्रावर लँड झाली असती” आणखी एक युजर लिहितो, “मॅडम तुम्ही स्कूटी येथे पार्क करू शकत नाही”
काही युजर्सनी “पापा की परी” हा टॅग वापरत कमेंट्स केल्या आहेत. “पापा की परी” हा टॅग सोशल मीडियावर विनोदी पद्धतीने वापरला जातो. जेव्हा मुलीने एखादी चूक केली तेव्हा तिला “पापा की परी” म्हणत ट्रोल केले जाते. या व्हिडीओमध्ये इमारतीला लटकवलेली स्कूटी पाहून काही युजर्सनी एखाद्या मुलीने हे केलं असावं, अशी शंका व्यक्त केली आहे.