scorecardresearch

Video: आलियाच्या डोहाळे जेवणात नीतू कपूर मराठी गाण्यावर थिरकल्या? दीपिका व कतरिनाचा अंदाजही पाहा

Alia Bhatt Baby Shower: कुणी तरी येणार येणार गं गाणं हे सगळ्या डोहाळे जेवण कार्यक्रमाची शान मानलं जातं. मग आलियाचं डोहाळे जेवण त्याला अपवाद कसा ठरेल.

Video: आलियाच्या डोहाळे जेवणात नीतू कपूर मराठी गाण्यावर थिरकल्या? दीपिका व कतरिनाचा अंदाजही पाहा
Alia Bhatt baby shower (फोटो:इंस्टाग्राम)

Alia Bhatt Baby Shower Video: मॉम टू बी आलिया भट ही सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. गंगुबाई काठियावाडी नंतर थेट हॉलिवूड वारी व आता ब्रम्हास्त्रमुळे आलियाच्या प्रोफेशनल आयुष्यात दिवसागणिक प्रगती होत आहे. दुसरीकडे बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरसह याच्यासह विवाहबंधनात अडकल्यावर आता आलिया लवकरच आई होणार आहे. कपूर कुटुंब नवीन पाहुण्याच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेच. तर मॉमी आलियाही चित्रपटांच्या प्रमोशनला आपला बेबी बंप दाखवत स्टायलिश अंदाजात दिसून येतेय. अलीकडेच सोशल मीडियावर आलियाच्या डोहाळे जेवणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यात रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडस दीपिका, कतरिना व प्रियांकाही ठुमकताना दिसत आहेत.

आलियाच्या डोहाळे जेवणाचा हा व्हिडीओ म्हणजे खरंतर नेटकऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आलेली मजेशीर क्लिप आहे. अशी ही बनवाबनवी चित्रपटातील कुणी तरी येणार येणार गं या प्रसिद्ध गाण्यावर आलिया, नीतू कपूर, दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा अशा सगळ्यांचे चेहरे लावून ही धम्माल एडिट केलेली क्लिप व्हायरल होतेय. यात नीतू कपूर यांचा मराठमोळा अंदाज पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

अशी ही बनवाबनवी चित्रपटातील कुणी तरी येणार येणार गं गाणं हे सगळ्या डोहाळे जेवण कार्यक्रमाची शान मानलं जातं. मग आलियाचं डोहाळे जेवण त्याला अपवाद कसा ठरेल. स्वतःच पाहा हा धम्माल व्हिडीओ

आलिया बेबी शॉवर

दरम्यान, आलिया व रणबीरच्या ब्रम्हास्त्रने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. यापूर्वी बॉयकॉट ट्रेंड वरील भाष्यानंतर आलिया प्रचंड ट्रोल झाली होती. चाहत्यांसह अगदी सेलिब्रिटी सुद्धा आलियाच्या वागण्याने नाखूष होते पण सुदैवाने याचा परिणाम ब्रम्हास्त्रच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झालेला दिसला नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून आलियाच्या अभिनयाचे आणि एकमेव वाक्यावरूनही अनेक मीम्स आले हा वेगळा मुद्दा पण नव्या बाळाची चाहूल आलिया- रणबीरसाठी लकी ठरलीये असं म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video alia bhatt baby shower neetu kapoor danced on marathi song kunitari yenaar ga deepika and katrina dancing svs