तुम्ही कितीही सावधगिरी बाळगली तरी देखील अनेकदा दुसऱ्याच्या चुकीमुळे अपघात घडतात. नुसतं गाडी चालवतानाच नाही तर रस्त्यावरुन चालताना देखील लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. अशातच प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे. कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला. एका तरुणाने खरंच यमराजाला चकवा दिला आहे. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केलाय.
एका तरुणावर गाडीच्या रुपात मृत्यू आला तर दुसऱ्या गाडीने त्याच मृत्यूला पिटाळून लावलं आहे. देव तारी त्याला कोण मारी, असं म्हणतात. याचा प्रत्यय देणारा अपघाताचा हा व्हिडीओ. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करत तुम्हालाही नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर हा व्हिडीओ पाहा असं म्हंटलं आहे.
नेमकं काय घडलं? –
व्हिडीओत सुरुवातीला एक व्यक्ती पाठीवर पिशवी लटकवून उभा असल्याचे दिसत आहे. तो रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगच्या बाजूला उभा आहे. व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, त्या व्यक्तीच्या बुटाला काहीतरी लागलं आहे, जे तो काढण्याचा प्रयत्न करत आहे.या काळात पुढच्याच क्षणी तिथे काय घडणार आहे, हे त्याच्या लक्षातच आलं नाही आणि तो तिथेच मागे पुढे करत राहिला. तेवढ्यात थराराक घटना घडली. एक अनियंत्रीत कार भरधाव वेगाने आली आणि हा तरुण उभ्या असलेल्या मेटलच्या पोलला धडकली. काहीच क्षणांपूर्वी हा तरुण तेथून थोडा बाजूला झाला. जेव्हा हा सगळा प्रकार घडला होता.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – Viral video: मगरीचा डाव फसला आणि जिराफ थोडक्यात वाचला; मगरीची रिअॅक्शन पाहून पोट धरून हसाल
हा व्हिडीओ सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे. आपण सर्वांनी रस्त्याने चालताना तसेच गाडी चालवताना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याने चालताना आजूबाजूला लक्ष ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण कधीकधी आपण बरोबर असलो तरी देखील समोरच्या व्यक्तीच्या चुकांमुळे मोठ-मोठे अपघात घडतात. जर तुम्ही सावधगीरी बाळगली, तर तुम्ही अशा अपघातांपासून स्वत:ला तसेच इतरांना वाचवू शकता.