Video Bride Wants Two Wedding: जर एखाद्याचं लग्न जबरदस्ती केलं तर त्याचे काय परिणाम होतात ते आजवर अनेक गुन्ह्यांच्या रूपात समोर आले आहे. पण गोंधळ घालायला किंवा गुन्हे करायला सुद्धा ही मंडळी थोडा वेळ घेतात. पण आता जबरदस्ती लग्न लावून दिलेली नवरी इतकी भडकली आहे की तिने चक्क लग्नाच्या वेषातच पोलीस स्टेशन गाठल्याचे समजतेय. पोलिसांसमोर या महिलेने असा काही धिंगाणा घातला की तिला आवरताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले होते. चक्क महिला पोलिसांसमोर अंगात भूत संचारल्याप्रमाणे ही महिला नाचत होती, लोळत होती आणि या सगळ्यात तिची मागणी एकच होती ती म्हणजे, “मला दोन लग्न करायची आहेत.” नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया…

तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ही महिला नवरीच्या रूपात सजलेली आहे. लाल- सोनेरी रंगाची नवरीची साडी अक्षरशः सुटेपर्यंत या महिलेने गदारोळ माजवला होता. ती रागात एकदा तर स्वतःचा फोन, हातातला कसला तरी कागद सुद्धा फेकून देते व जमिनीवर लोळण घेताना दिसत आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिने घरच्यांच्या इच्छेसाठी त्यांनी सांगितलेल्या मुलाशी लग्न केलं आणि आता तिला स्वतःच्या इच्छेसाठी स्वतःच्या बॉयफ्रेंडशी सुद्धा लग्न करायचं आहे, यासाठीच ती मी दोन लग्न करणार असा हट्ट धरून बसली आहे.

Video: नवरीचा धिंगाणा व्हायरल

हे ही वाचा<< मेट्रोमध्ये बिकिनी घालून चढलेल्या तरुणीने हद्दच पार केली; Video पाहून लोकं म्हणतात, “उर्फीमुळे उद्या नग्न…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ८० हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक ऑनलाईन प्रेक्षकांना या महिलेला पाहून विद्या बालनच्या मंजुलिकाची आठवण आली आहे. अनेकांना महिलेची मागणी सुद्धा योग्य वाटत आहे पण सगळ्यांनाच तिच्या नवऱ्याची दया येत आहे. काहींनी तर तिचा हंगामा बघून बिचाऱ्या पोलिसांना काय काय सहन करावं लागतं अशाही कमेंट केल्या आहेत. नवरीने साडी सुटेपर्यंत, पदर सांभाळता येत नाही तरी भांडण्याची जी जिद्द दाखवली ते बघून हसावं की रडावं हेच कळत नाही अशाही कमेंट केल्या आहेत.