Bride Groom Viral Video: लग्नाच्या दिवशी नवरा-नवरी, त्यांचं कुटुंब याहीपेक्षा कुणी जास्त उत्सुक असेल तर ते असतात त्यांचे मित्र. नवरीच्या मैत्रिणी जशा वर्षभर आधीपासून कपडे, दागिने, स्पिनस्टर, फोटोशूट सगळ्याची तयारी करतात. तसेच नवऱ्याचे मित्र सुद्धा आपल्या ‘भाई’च्या लग्नासाठी एकदम जबरदस्त एनर्जित असतात. असं म्हणतात मुलांची मैत्री इतकी घट्ट असते की चिडवाचिडवी शिवाय त्यांची नातीच टिकत नाहीत. अर्थात हे बोललं जात असलं तरी यात किती तथ्य आहे हे सिद्ध झालेलं नाही. कदाचित सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ या वाक्याचा प्रूफ असू शकतो. एका मित्राच्या लग्नात त्याचे सगळे वऱ्हाडी मित्र चक्क नवरीकडेच मजेशीर मागण्यांच्या घोषणा करू लागले.
तुम्ही व्हिडिओत ऐकू शकता की, पंकज आणि दिव्या अशी नवरा-नवरीची नावं आहेत. मंडपात पंकजचे सगळे मित्र गोळा झाले आहेत आणि मैत्रिणीसह बसलेल्या दिव्याच्या नावाचा जयघोष करत आहेत. सुरुवातीला दिव्या भाभी झिंदाबाद अशा घोषणा ही मित्रमंडळी देतात आणि मग त्यांच्या मजेशीर मागण्या सुरु होतात. दिव्या भाभी बर्तन धुलाओ हम तुम्हारे साथ है.. दिव्या भाभी झाडू लगाओ अशा एकापेक्षा एक भन्नाट घोषणा ही मंडळी देतात. यावेळी नवरीचा चेहरा लाजून पार लाल झाला आहे.
नवऱ्याच्या मित्रांच्या हटके मागण्या
हे ही वाचा << Video: अमृता फडणवीस यांनी डान्स करून नेटकऱ्यांना दिलं खुलं चॅलेंज, ‘या’ कमेंट्स एकदा वाचाच
दरम्यान, हा व्हिडीओ यंदाच्या लग्नाच्या सीझनमधील असावा यावर लिहिल्याप्रमाणे खरंच पंकज म्हणजे नवरोबा मनातल्या मनात म्हणत असतील की विचित्र अपमान आहे यार! आणि अशीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्येही दिसून येत आहे. या व्हिडिओला जवळपास १२ लाख लाईक्स आणि मिलियन व्ह्यूज आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.