scorecardresearch

Premium

गरोदर महिलेला हॉटेलमध्ये काम करताना पाहून व्यक्तीने दिले थेट १ लाख रुपये; VIDEO पाहून म्हणाल हीच खरी श्रीमंती

Viral video: या व्यक्तीनं केलेलं कृत्य पाहून म्हणाल माणुसकी अजूनही जिवंत आहे

video customer gave one lakh rupees to a pregnant waitress working in the restaurant watch viral emotional video
माणुसकीचं दर्शन

Viral video: गर्भधारणेदरम्यान काम करणे अनेकदा कठीण असते. अनेक वेळा महिलांना इच्छा नसतानाही काम करावे लागते. या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खूपच भावूक आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक ग्राहक हॉटोलमध्ये काम करणाऱ्या गर्भवती महिलेला चक्क १ लाख रुपये टिप देतो. हे पाहून महिला भावूक होऊन ग्राहकाला मिठी मारते. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्याचवेळी, लोक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. 

Man finds worm crawling in orange he bought from Zepto Company issues refund
Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी
sourav ganguly
सौरव गांगुलीचा १.६ लाखांचा मोबाईल घरातून चोरी, दादाने व्यक्त केली मोठी भीती, ‘या’ व्यक्तीवर संशय
Aaicha Patra Mother Died Of Cancer Old Letter To Son Telling How Much She Loves Thanking For Efforts Will Make You Emotional
“माझं लक्ष असेल..”, कॅन्सरने जीव गमावलेल्या आईने लेकाला मृत्यूपूर्वी लिहिलेलं पत्र सापडलं; डोळे पाणावणारे ते शब्द..
Why do we say bless you after a sneeze
एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर ‘God Bless You’ असे का म्हणतात?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला वेटर रेस्टॉरंटमध्ये जेवण देत असल्याचे दिसून येते. ती ग्राहकाशी बोलते. यानंतर ग्राहक एक नोटांचे बंडल महिला वेटरला देतो. महिला ते घेण्यास नकार देते. पण ग्राहक तिला जबरदस्ती पैसे देतो. हे पाहून ती खूप भावूक होते. यानंतर तिने ग्राहकाला मिठी मारली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> देवाक काळजी रे! अंध आई-वडिलांचा चिमुकली मुलं बनली आधार; दिल्ली मेट्रोतील भावूक करणार VIDEO व्हायरल

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘महिलांना अशा वेळी सुट्टी दिली पाहिजे.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘असे लोक फारच कमी दिसतात.’

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Video customer gave one lakh rupees to a pregnant waitress working in the restaurant watch viral emotional video srk

First published on: 24-11-2023 at 13:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×