प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नाच्या या आठवणी वेगवेगळ्या प्रकारे कॅमेऱ्यात कैद करण्याचा जोडप्याचा प्रयत्न असतो. लग्नाआधी केल्या जाणाऱ्या या फोटोशूटसाठी काही लोक जंगलात जातात, काही लोक डोंगरावर जातात, कोणी किल्ल्यावर जातं, तर कोणी भर समुद्रात बोटीवर फोटोशूट करतं. बरं हे फोटो काढताना काही मंडळी ज्या काही पोझ देतात त्या पाहून खरंच दंग व्हायला होतं.त्यातही सध्या प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड असून यासाठी वेगवेगळ्या कल्पना असतात. मात्र काही दांपत्यानी असं काही प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे की त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत..कपलने नाल्यात फोटोशूट केलं आहे.

कपलचं नाल्यात रोमँटिक फोटोशूट

या फोटोत कपल चक्क नाल्यात दिसतं आहे. कपलने नाल्यात फोटोशूट केलं आहे. अस्वच्छ पाण्यात कचऱ्यामध्ये त्यांनी हसत हसत आपले फोटो काढले आहेत.एक फोटो तर हैराण करणारा आहे, ज्यात कपल रोमान्स करताना दिसतं आहे. एकमेकांना किस करत आहे.बहुतेकांनी हे फोटो फेक असल्याचं म्हटलं आहे. हे फोटो AI मार्फत बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. काही जोडप्यांनी केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी फोटोशूट करण्यासाठी एक अनोखी आणि भलतीच आयडिया वापरली आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर हे पाहा, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून नेटकरीही अनेक गमतीशीर प्रतिक्रिया यावर देत आहेत.