Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमकं कधी काय पाहायला मिळेल याचा अंदाज बांधणेही आता अशक्य झाले आहे. कधी मेट्रोमध्ये किसिंग, कधी ट्रेनमध्ये भांडण, कधी भररस्त्यात गाड्यांचे स्टंट एक ना अनेक प्रकारे हे व्हायरल स्टार्स आपल्याला थक्क करत असतात. बरं लोकं यांच्या व्हिडिओवर टीकांचा पाऊस जरी पाडत असली तरी पुन्हा पुन्हा आवडीने यांचेच व्हिडीओ बघतात. असाच एक विचित्र व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये खरंतर आक्षेपार्ह्य असं काही नसलं तरी पण व्हिडीओ पाहून सर्वांना एकच प्रश्न पडलाय तो म्हणजे, ” का ताई, का?” नेमकं यात असं आहे तरी काय चला बघूया.

इंस्टाग्रामवर पारुल अरोरा या फिटनेस मॉडेलने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये पारुल रस्त्यात गाडी उभी करून एक भन्नाट स्टंट करताना दिसत आहे. गाडीचे दार न उघडता तुम्ही गाडीमध्ये कसे बसू शकता हे दाखवणारी निन्जा टेक्निक असे या व्हिडीओचे कॅप्शन आहे. पारूलच्या फिटनेसचं आणि लवचिकतेचं खरोखरच कौतुक करावं वाटेल असाच हा व्हिडीओ आहे. पण हा प्रकार करून तसं तुम्हाला सिद्ध काय करायचं होतं असाही प्रश्न नेटकरी करत आहेत. आता हा एवढा चर्चेतील व्हिडीओ आहे तरी काय यावर एक नजर टाकूया…

Video: गाडीचे दार न उघडता गाडीत बसायचं तरी कसं?

हे ही वाचा<< … म्हणून संसदेत पिंक हिल्स घालून पोहोचले पुरुष खासदार, Video पाहून लोकांनी केलं कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडिओवर २ लाखाहून जास्त लाईक्स व हजारो कमेंट्स आहेत. अनेकांनी तिच्या फिटनेसची दाद दिली आहे. तर काहींनी या गाडीच्या नावाला पारुलचा व्हिडीओ सूट होत असल्याचे म्हणत मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी यावरून स्वतःच्या फिटनेसची तुलना करत मला साधं खाली वाकायला सांगितलं तरी कंटाळा येतो असेही म्हंटले आहे. काहींनी तर उपहासाने कमेंट करून “तिला आमचं चुकलं आतापर्यंत दार उघडून आत बसत होतो यापुढे असंच बसू” अशाही कमेंट केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? हे कमेंट करून सांगा.