Premium

पुलावरून कारने घेतली झेप, मध्ये बस येताच थेट… हर्ष गोएंकांनी शेअर केलेला Video पाहून होईल काळजाचं पाणी पाणी!

Viral Video: जेव्हा कार ब्रिजच्या वरच्या बाजूला असते तेव्हाच भोगद्याच्या जवळ बस येते. यावेळी कारचालक पूर्ण…

Video Harsh Goenka Shares Car crossing Road Through Top Of The Bus Roof Industrialist Shocked After Seeing Rohit Shetty Film Stunt
ब्रिजवरून कारने घेतली झेप, मध्ये बस येताच थेट… (फोटो: ट्विटर)

Viral Video Today: आजवर आपण रोहित शेट्टीच्या चित्रपटात गाड्या उडताना पाहिल्या आहेत. बॉलिवूडच कशाला तर अगदी जगात गाजत असलेल्या दाक्षिणात्य सिनेमात, हॉलिवूडमध्येही कधीकधी हे कोणतं विज्ञान आहे इथपर्यंत प्रश्न पडावा असे स्टंट दाखवले जातात. पण विचार करा तुम्ही प्रवास करताना अचानक असा एखादा प्रकार प्रत्यक्ष समोर पाहिला तर? आधी भीतीच वाटेल ना? उद्योगपती हर्ष गोएंका यांनी अलीकडेच आपल्या ट्विटर अकाउंटवर अशाच एका परफेक्ट टाईमिंग जुळून आलेल्या प्रसंगाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात एक कार एका फ्लायओव्हर वरून थेट दुसऱ्या लेनमधील ब्रिजवर जाताना दिसत आहे पण यासाठी निंजा टेक्निक कार चालकाने वापरली ती बघून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एक फ्लयॉव्हर दिसतोय यामध्ये एका बाजूने वर जाण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूने खाली येण्यासाठी असे दोन्ही ब्रिज दिसत आहेत. याच्या मधोमध एक वेगळा भोगदा जात आहे. जेव्हा कार ब्रिजच्या वरच्या बाजूला असते तेव्हाच भोगद्याच्या जवळ बस येते. यावेळी कारचालक पूर्ण रस्त्याला वळसा घालून जाण्यापेक्षा थेट बसच्या छ्तावरूनच पलीकडच्या लेनवर गाडी फिरवतो. यावेळी जराशी चूक झाली असती तरी बस व कार दोन्ही मधील लोकांचा जीव धोक्यात आला असता पण हा प्रकार असा परफेक्ट वेळेत घडला की हा एखाद्या सिनेमातील चित्रित केलेला सीनच वाटत आहे.

Video: पूल ओलांडण्यासाठी भलताच शॉर्टकट?

हे ही वाचा<< पाटणा रेल्वे स्टेशनवर पॉर्न लागल्यावर पॉर्नस्टारचे ‘ते’ ट्वीट चर्चेत! म्हणते, “माझी इच्छा आहे की…”

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यापासून नेटकऱ्यांनी हर्ष गोएंका यांना भलताच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. ही काय CEAT टायरची जाहिरात का? अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत. तर गाड्यांची आवड असणाऱ्यांना हा थ्रिलिंग व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. तुम्हाला हा स्टंट कसा वाटला, साहसी की जीवघेणा? हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 09:38 IST
Next Story
Video viral: प्रवाशांची गर्दी, AC लोकलचा दरवाजा उघडाच? पाहा काय घडलं