Viral Video : संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येतोच. कोणी प्रेमासाठी झगडतो, कोणी पैशासाठी झगडतो, कोणी पोटा पाण्यासाठी झगडतो तर कोणी स्वप्न पूर्ण करण्यासाठी. प्रत्येकाचा आपले दु:ख मोठेच वाटते पण जेव्हा आपण इतराचं दु:ख बघतो तेव्हा आपल्याला आपलं दु:ख कमी वाटतं. अमृत चित्रपटातील “दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है” हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या लोकांना वाटतं आयुष्य खूप कठीण आहे, त्यांनी हा व्हिडीओ एकदा तरी पाहावा.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संघर्षाची व्याख्या सांगितली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला धो धो पाऊस पडताना दिसेल. रस्त्यावरून वाहने जाताना दिसेल पण एका फळ विक्रेत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक फळ विक्रेता दिसेल जो धो धो पावसात त्याच्या फळाच्या गाड्याखाली बसलेला दिसत आहे. पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तो बसला आहे. तो गाडा घेऊन निघून जाऊ शकत होता पण त्याने तसे केले नाही कारण त्याला फळ विकायचे होते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. आयु्ष्य कठीण आहे पण आपण ते सोप्प करायला पाहिजे. कारण संघर्ष टाळता येत नाही, पण तो स्वीकारल्यावरच आपली खरी ताकद समोर येते.
पाहा व्हायरल व्हिडीओ
thewanderwhisperer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “जर तुम्हाला कोणीही म्हणालं, जीवन कठीण आहे , त्यांना हा व्हिडीओ दाखवा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडिओ जगातील सर्व मुलांना दाखवा जेणेकरून त्यांना प्रेम, जबाबदारी आणि निष्पक्षतेचे महत्त्व समजणार” तर एका युजरने लिहिलेय, “व्यवसाय सुरू करण्यास त्यांना मदत करा” आणखी एका युजरने लिहिलेय, “आयुष्य प्रत्येकासाठी सुंदर नसतं” एक युजर लिहितो, “याला म्हणतात खडतर आयुष्य” तर एक युजर लिहितो, “खरंय, आपल्याजवळ जे नाही त्याच्यासाठी आपण रडतो आणि जे आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो” एक युजर तर लिहितो, “यालाच आयुष्य म्हणतात” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर भावुक करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.