Woman Dance Video: मागील काही काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडिओमध्ये परदेशी नागरिकांना कशी भारतीय संस्कृतीची भुरळ पडली आहे हे पाहायला मिळते. परदेशातील आपलं विश्व सोडून भक्ती, प्रेमासाठी भारतात आलेल्या अनेक सुंदर ललनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे पण गंमत म्हणजे यात एका महिलेला चक्क वरातींची भुरळ पडली आहे. कमेंट्सनुसार एक आफ्रिकन महिला लाल साडी नेसून वरातीत भन्नाट डान्स करत आहे.
तुम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, काही महिला एका घराबाहेर जमल्या आहेत. त्यांच्या साज- शृंगारावरून तरी त्या लग्नासाठी आलेल्या होत्या असे दिसत आहे. यात एक आफ्रिकन महिला सुद्धा वऱ्हाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. ढोलाचा आवाज जसा वाढत जातो तशी ही महिला सुद्धा ताल धरू लागते. यात तिला अजून प्रोत्साहन द्यायला आणखी एक महिला नाचू लागते नंतर दोघींची जुगलबंदी पाहून बाकीच्या स्त्रिया सुद्धा हसून नाचू लागतात.
Video: पाहुणीचा लाल साडी नेसून भन्नाट डान्स
हे ही वाचा<< बाळ रांगत उंच जिन्यापाशी आलं, उडी मारणार तितक्यात मांजरीने… Video पाहून लोकं म्हणतात, “त्यांना धूर्त बोलताना..”
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या महिलेचे खूप कौतुक केले आहे. हा व्हिडीओ नेपाळ मधील असल्याचे समजत आहे. @Everything About Nepal या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तब्ब्ल ४० हजार लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे व त्यावर अगदी मजेशीर व कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. “या बायकांना खरंच कशी आयुष्याची मजा घ्यायची हे माहीत आहे”, “खूप सुंदर संस्कृती आहे, जी सगळ्यांना आपलंस करून घेते” असेही अनेकांनी म्हंटले आहे.”