Indian Aunty Viral Video: प्रेमाला, नव्या अनुभवांना व शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण काही वेळा उत्साहाच्या भरात केलेल्या गोष्टी नंतर चांगल्याच अंगाशी येऊ शकतात. अशीच अवस्था इंस्टाग्रामवरील एका काकूंची झाली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक काकू घसरगुंडीवर खेळताना दिसत आहेत. त्यांचा उत्साह व चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्यालाही अगदी भारावून जायला होते पण जशा त्या घसरगुंडीच्या टोकाशी पोहोचतात तेव्हा जे घडतं ते बघून एक क्षण आपल्याला धडकी भरेल.
सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये महिलेने बालपणीच्या आठवणीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओमध्ये एक महिला पार्कमध्ये लहान मुलांच्या घसरगुंडीवर खेळताना दिसत आहे. महिला पार्कमधील घरगुंडी खेळताना जेव्हा खाली येते तेव्हा स्लाईडच्या टोकावर ती जोरातने आपटते. यावेळी महिलेच्या हावभावांवरूनच आपण अंदाज लावू शकता की त्यांना प्रचंड वेदना होत असणार.
Video: काकूंचा उत्साह बघून हसावं की वेदना बघून रडावं…
हे ही वाचा<< बर्फाळ टेकडीवर दुर्मिळ बिबट्याची लढाई! उतारावरून कोसळताना केली शिकार, Video पाहून व्हाल थक्क
दरम्यान, @KasthuriGowda या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेचा हीच साडी नेसून पाळण्यावर झुलताना व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला तब्बल चार लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून महिलेच्या हसत्या खेळत्या स्वभावाचे कौतुक केले आहे.तुम्हीही हा व्हिडीओ पाहिलात, आता सांगा असा आनंद आपण शेवटचा कधी अनुभवला होता?