पाण्याची टाकी रिकामी न करता कशी स्वच्छ करायची? तरुणाचा जुगाडू Video पाहून म्हणाल, “भाई पैसे वाचले”

Viral Video: चक्क पाण्याची टाकी रिकामी न करता स्वच्छ कशी करायची याचा भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. हा व्हिडीओ पाहून सध्या अनेकजण या हुशारीचे कौतुक करत आहेत

Video Jugadu Man Teaches How To Clean Water Tank Without Removing Water Netizens Say You Are Saving Money
पाण्याची टाकी रिकामी न करता कशी स्वच्छ करायची? (फोटो: ट्विटर)

Jugaad Video: आपल्या सर्वांच्या घरात नळ व एक पाण्याची टाकी असते. पूर्वी संपूर्ण बाथरूममध्ये ज्या बादल्या भरून ठेवाव्या लागायच्या ते कष्ट या पाण्याच्या टाकीने कमी केले आहेत. पण जेव्हा या पाण्याच्या टाकीला साफ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाकी नऊ येतात. आता रोजच्या वापरात पूर्ण टाकी रिकामी होतेच असं नाही पण स्वच्छ करायची म्हणजे सगळं पाणी उपसून काढणं गरजेचं आहे. मग ते पाणी ठेवायचं कुठे की सरळ नळ सुरु करून पाणी वाहून जाऊ द्यायचं असे सगळं प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. पण तुम्हाला माहित आहे का एका तरुणाने चक्क पाण्याची टाकी रिकामी न करता स्वच्छ कशी करायची याचा भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. हा व्हिडीओ पाहून सध्या अनेकजण या हुशारीचे कौतुक करत आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

युट्युबवर @ACA TECHNOLOGIES या पेजवर हा व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा घरातील पाण्याची टाकी विना पाणी काढता कधी स्वच्छ करायची हे शिकू शकता. यामध्ये तरुणाने एक भन्नाट जुगाडू यंत्र बनवले आहे. तो प्लास्टिकची बॉटल अर्धी कापून त्याला साधा पीवीसी पाईप व रबरचा पाईप जोडतो. बॉटलचा मागचा भाग टाकीच्या आत टाकायचा आहे, पाईप जमिनीवर सोडून द्यायचा आहे व मग आपोआपच टाकीच्या तळातील घाण थोड्या थोड्या पाण्यासह निघून बाहेर येताना दिसेल.

टाकी रिकामी न करता केली स्वच्छ, जुगाड Video

हे ही वाचा<< ट्रेन ‘या’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? तुमच्या रेल्वे तिकिटावरील ‘या’ अक्षरांचे खरे अर्थ जाणून घ्या

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तरुणाच्या हुशारीचे कौतुक केले आहे. व्हिडिओवर व्ह्यूज केवळ ६६ हजार असले तरी कमेंटमध्ये अनेकांनी या ट्रिकचा आपल्याला फायदा झाल्याचे म्हंटले आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 09:43 IST
Next Story
सोफीच्या फिरकीनं ३ फलंदाजांना गुंडाळलं अन् मुंबईच्या धावसंख्येचा वेग मंदावला, गोलंदाजीचा Video पाहिलात का?
Exit mobile version