Leopard Attack Video: बिबट्या हा अत्यंत घातक शिकारी म्हणून ओळखला जातो. तो गर्द झाडीमध्ये देखील शिकार करू शकतो. तो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेकदा वाघ, सिंह देखील बिबट्याच्या वाटेला जात नाहीत. अशाच एका खतरनाक बिबट्याचा आणखी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याने हायवेवर सायकलवरून जात असलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केलाय. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहताना अंगावर काटा येतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सायकलस्वार आणि बिबट्या या दोघांचंही नशीब चांगलं होतं म्हणून वाचले, असंच म्हणाल. हा व्हिडीओ आसाममधील काझीरंगा पार्कमधला आहे. तसा हा व्हिडीओ फार जुना आहे. जून २०२२ मधला हा व्हिडीओ असून सोशल मीडियावर तो पुन्हा नव्याने व्हायरल होऊ लागलाय.

आणखी वाचा : भूकेने व्याकूळ हत्ती चक्क प्लॅस्टिक खाऊ लागला, VIRAL VIDEO पाहून नेटकरी संतापले

हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. काझीरंगा येथील अधिकाऱ्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जानेवारीमध्ये हादरवून सोडणारी घटना कैद झाली होती, असे ते म्हणाले. बिबट्या हायवेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता. जंगलातून जाणार्‍या हायवेवरून सायकल चालवत एक व्यक्ती जात होता. पुढच्या काही सेकंदांच्या दृश्यामध्ये एक बिबट्या झुडपांतून उडी मारून थेट सायकलस्वार माणसावर झेपावताना दिसत आहे. मात्र, तोल गेल्याने सायकलस्वार रस्त्यावर पडला. तो घाबरून पटकन उभा राहतो सायकल वळवून तिथून सुखरूप निसटतो आणि बिबट्याही पुन्हा जंगलात पळून गेला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वाघ जेव्हा भडकलेल्या वाघिणीसमोर उंदरासारखा होतो तेव्हा…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आधुनिक युगातील ‘कबीर सिंग’! एकाच वेळी १५ सिगारेट ओढताना दिसला

बिबट्या अनुकूली जातीचे असतात. म्हणजे ते सभोवतालच्या वातावरणात पटकन मिसळतात. ते शेतात, उसाच्या मळ्यात, चहाच्या मळ्यात आणि अगदी शहरांमध्येही राहतात. अगदी डोंगर आणि जंगलातही. कधीकधी त्यांना तोंड देणे सुरक्षित असतं, परंतु कधीकधी प्रकरण गंभीर बनतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. बिबट्याचा अचानक हल्ला पाहून लोक अचंबित झाले.