Metro Drunk Man Viral Video: ट्रेन, मेट्रोने दिवसातून लाखो प्रवासी प्रवास करतात. सार्वजनिक वाहतूकीचे वैशिष्ट्य हेच की कोणताही भेदभाव न करता अगदी कमी रक्कमेत तुम्ही प्रवास किंबहुना सुखाचा प्रवास करू शकता. मात्र काही वेळेला सह प्रवाशांच्या त्रासाने डोकेदुखी वाढते हे ही तितकंच खरं. भांडकुदळ प्रवासी, बडबडे प्रवासी, उगाच रोमँटिक झालेलं कपल असे अनेक प्रकार तुम्हीही पाहिले अनुभवले असतील. असाच एक विचित्र प्रवासी अलीकडे मेट्रोमध्ये चढला होता. साहेबांना दारूची इतकी नशा झाली होती की त्यांना सरळ उभे राहणे ही शक्य नव्हते. अशावेळी आधी या बेवड्याने इतरांशी भांडणाचा सूर छेडला होता आणि मग तर चक्क सर्वांच्या पाया पडून विनंती करण्याचा प्रकार केला. आता त्यांची दारूच्या नशेतील विनंती व्हिडीओ रूपात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओत स्वतः दारुड्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार ही क्लिप दिल्ली मेट्रोची आहे हे समजतेय. सदर व्यक्त नोएडा सेक्टर १५ या मेट्रो स्टेशनवरून चढला होता व त्याला पुढे जायचे होते. मेट्रोमध्ये त्यावेळेस इतकी गर्दीही नव्हती पण तरी देव जाणे कोणावर पण हा माणूस रागात भांडू लागला. “हे बघा माझ्याकडे मेट्रो टोकन आहे असं सांगून मला सगळं कळतं तुम्ही मला शिकवणारे कोण” असं हे साहेब हवेतच कोणाला तरी विचारू लागले.

हे भांडण सुरु असताना अचानक समोरच्या सीटवर बसलेल्या एका सरदारजी कडे त्याचं लक्ष गेलं आणि मग चक्क इंस्टाग्राम रीलचा फिल्टर बदलावा अशा वेगाने त्याचा सूरच बदलला. अचानक तो गुडघे टेकून खाली बसला आणि चक्क समोरच्या प्रवाशाकडे पाहून लोटांगण घालून बडबडू लागला.

Video : बेवड्याचा अजब- गजब कारनामा

हे ही वाचा<< पुलावरून कारने घेतली झेप, मध्ये बस येताच थेट… हर्ष गोएंकांनी शेअर केलेला Video पाहून होईल काळजाचं पाणी पाणी!

दारूच्या नशेत पूर्ण धुंद असलेल्या या माणसाने सरदारजींना पाहून ‘वाहे गुरु दी खालसा, वाहे गुरु दी फतेह’ असे म्हणायला सुरुवात केली. मग सुदैवाने त्या सद्गृहस्थाने त्याला समजावून उभं केलं व तू आता तुझं स्टेशन आल्यावर उतरून घरी जा असं सांगितलं. हा काही सेकंदांचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या मित्रांची आठवण येत आहे. तुमच्याही ओळखीत असे कोणी असेल तर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video metro drunk man creates chaos fights in train viral then touches feet of passenger memes on drunk night hangovers svs