Escalator Swallows Man Viral Video: पूर्वी फक्त मोठ्या मॉलमध्ये पाहायला मिळणारे एस्केल्टेअर म्हणजेच सरकते जिने आता जवळपास सर्वच रेल्वे स्टेशनवर आहेत. हे सरकते जिने सर्वत्र असूनही अजूनही सवयीचे झालेले नाहीत. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना हे जिने वापरायला भीती वाटते, या जिन्यावर पाय ठेवताना काहीजण पडतात, घाबरतात असे दृश्य आपणही अनेकदा पाहिले असेल पण आज जो व्हायरल व्हिडीओ आपण पाहणार आहोत तो बघून तर तुम्हीही हे सरकते जिने वापरायला घाबरून जाल. बीबीसीच्या माहितीनुसार हा प्रसंग फेब्रुवारी २०१८ मध्ये इस्तंबूल टर्की येथील Ayazaga मेट्रो स्टेशनवर घडला होता. सह्दराण २५-३० प्रवासी या सरकत्या जिन्यावर उभे असताना एस्केलेटरच्या पायऱ्या अचानक दुभंगतात.
आपण CCTV व्हिडिओमध्ये पाहू शकता, एस्केलेटरवरून खाली जाताना अचानक काहीतरी बिघाड होतो. आणि पायऱ्या दुभंगून हा माणूस खाली खेचला जातो. जीव वाचवण्यासाठी हा माणूस शेजारच्या रेलिंगला पकडण्याचा प्रयत्न करतो पण बिघडलेल्या एस्केलेटरचा जोर इतका तीव्र असतो की तो अक्ख्या माणसालाच आतल्या बाजूस खेचून घेतो. हा थक्क करणारा जुना व्हिडीओ सध्या पुन्हा व्हायरल होत आहे.
Escalator ने गिळला माणूस
दरम्यान, मेहमेत अली एरिक असे या व्यक्तीचे नाव असून, इतर प्रवाशांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र एस्केलेटरच्या यंत्रणेत आतील बाजूस तो असाच अडकून एक तास राहिला. सुदैवाने अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वाचवले, असे बीबीसीने तुर्की वृत्तपत्र एव्हरेन्सेलचा हवाला देत म्हटले आहे. त्यानंतर एका रुग्णवाहिकेने त्याला रुग्णालयात नेले होते. या माणसाचा जीव वाचला असला तरी हा थक्क करणारा व अंगावर काटा आणणारा अनुभव तो कधीच विसरू शकत नाही हे ही खरं आहे.
हे ही वाचा<< नेपाळच्या उडत्या बसचा Video होतोय व्हायरल; भयंकर खोल दरीवरून जीवघेणा प्रवास पाहिलात का?
इस्तंबूल मेट्रोपॉलिटन म्युनिसिपालिटी (IBB) च्या म्हणण्यानुसार, एस्केलेटरवर बिघाडाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही अनेक लोक याचा वापर करताना दिसतात. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी कमेंट करून आम्ही यापुढे जिन्याचा वापर करू असे लिहिले आहे.