NASA Found 8 Months Lost Tomatoes: अंतराळ संशोधन संस्था नासाने शुक्रवारी युट्युबवर एका खास व्हिडिओमध्ये अंतराळात हरवलेल्या दोन लहान टोमॅटोंची सद्यस्थिती दाखवली आहे. २०२२ मध्ये हे दोन लहान टोमॅटो अंतराळात हरवले होते. मातीशिवाय रोपाची लागवड करता येऊ शकते का याचा अभ्यास करणारा प्रयोग ‘एक्सपोज्ड रूट ऑन-ऑर्बिट टेस्ट सिस्टम’साठी अंतराळवीर फ्रँक रुबियो रुबियो टोमॅटो कापत असताना हे दोन टोमॅटो हरवले होते. २०२२ मध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा इतर अंतराळवीरांनी मस्करीत रुबिओने टोमॅटो खाल्ले असतील असा अंदाज बांधला होता. मात्र आता आठ महिन्यांपासून बेपत्ता असलेली दोन अंतराळात उगवलेली फळे नुकतीच ISS (इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) क्रूला सापडली आहेत.

स्पेस एजन्सीने असे उघड केले की टोमॅटो ”निर्जलित (सुके) आणि किंचित कुरकुरीत झाले होते परंतु त्यात सूक्ष्मजीव किंवा बुरशीची वाढ दिसून येत नव्हती”.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता

नासाने हा व्हिडीओ शेअर करताना मजेशीर कॅप्शन दिले आहे, ”XROTS प्रयोगासाठी लागवड करताना अंतराळवीर फ्रँक रुबिओने चुकून हरवलेले दोन टोमॅटो आता सापडले आहेत, त्यामुळे, हे सिद्ध झाले आहे की रुबियोने टोमॅटो खाल्लेले नव्हते. आमचा संशय खोटा सिद्ध झाला. ही फळे प्लॅस्टिकच्या पिशवीत डिहायड्रेटेड आणि सुकलेल्या स्थितीत आढळली असली तरी सूक्ष्मजीव किंवा बुरशीची वाढ दिसून आली नाही.”

नासाने पुढे सांगितले की, ”XROOTS साठी माती किंवा इतर वाढीच्या माध्यमांशिवाय वनस्पती वाढवण्यासाठी हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक तंत्र वापरण्यात आले होते. पृथ्वीवर ज्याप्रकारे रोपांची लागवड केली जाते तीच पद्धत वस्तुमानाचा अभाव, देखभाल आणि स्वच्छताविषयक समस्यांमुळे अवकाशातील वातावरणात वापरली जाऊ शकत नाही. पण XROOT ची माती विना केलेली लागवड भविष्यातील अंतराळ संशोधन मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या वनस्पती वाढीसाठी उत्तम उपाय ठरू शकते.”

Video: अंतराळात आठ महिने हरवलेले टोमॅटो सापडले

हे ही वाचा<< देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात गायलं किशोरकुमारांचं गाणं, निमित्त ठरलं खास; तुम्ही Video पाहिलात का?

नासाने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, ”अंतराळात वनस्पती वाढवण्याचे अनेक फायदे आहेत. अंतराळवीर सांगतात की बागकामात वेळ घालवल्याने अंतराळात जीवनमान व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी या उपक्रमांचा फायदा होतो. अंतराळ स्थानकावरील संशोधनामुळे अंतराळात रोपे यशस्वीरीत्या वाढवण्यासाठी आणि मानवांना अंतराळ प्रवासाच्या सीमा ओलांडण्यास मदत करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित होत आहेत.”