Video Shows Bull pushes bike riders : मानवी वस्तीत प्राणी दिसणं आता सामान्य झालं आहे. काही जंगलातील प्राण्यांमुळे गावाकडच्या शेतीचे तर नुकसान होतेच, पण आता शहरी भागात माणसांनादेखील या भटक्या प्राण्यांचा याचा त्रास होऊ लागला आहे. या भटक्या प्राण्यांना त्यांची हक्काची राहण्याची जागा नसल्यामुळे ते अन्न-पाण्याच्या शोधात प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत.तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बैल दुचाकीस्वारांसह बाईक ढकलताना दिसला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video ) दिल्लीचा आहे. दिल्लीच्या छत्तरपूरच्या गजबजलेल्या रस्त्यावर अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. तसेच रस्त्याच्या मधोमध चार ते पाच बैल उभे आहेत. बघता बघता त्यातील एक बैल दुचाकीस्वाराच्या बाईकजवळ जातो. बाईकवर दोन व्यक्ती बसलेल्या असतात. तितक्यात बैल येतो आणि बाईकला मागून आक्रमकपणे डोकं लावून ढकलताना दिसते. बैल दुचाकीस्वारांसह बाईक ढकलताना पाहून काही नागरिक त्यांची सुटका करण्यासाठी पुढे आले आहेत. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा एकदा बघाच.

हेही वाचा…विश्वास ठेवायचा कोणावर? लिफ्ट देणाऱ्या दुचाकीस्वाराचं चोरलं पाकीट; संशय येताच बेदम मारलं अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

लाचा दुचाकीस्वारांवर हल्ला :

व्हायरल व्हिडीओत (video) तुम्ही पाहिलं असेल की, बैल दुचाकीस्वारांसह बाईक ढकलत आहे. हे पाहून रस्त्याने जाणाऱ्यांनी, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा दुचाकीस्वारांना मदत करण्यासाठी धाव घेतली आणि बैलाला काठी दाखवत हकलवत, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्यास सांगताना दिसले. पण, या दरम्यान बैल पादचाऱ्यांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसला. तर नागरिक सुद्धा संभाव्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिथून धावत सुटले. अशाप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे तुम्हाला दिसून येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Exploring_life_007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘दिल्लीच्या छतरपूर भागात, गजबजलेल्या रस्त्यावर बाईकवरून आलेल्या दोन माणसांवर बैलाने हल्ला केला आहे’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. रस्त्याच्या विरुद्ध बाजूस ई-रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. तसेच या व्हिडीओचे दोन पार्ट करून पोस्ट करण्यात आले आहेत. दुसऱ्या पार्टमध्ये घटनेनंतर बैल रस्त्यावर इतर गुरांबरोबर उभा आहे असे दाखवलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर तर प्राण्यांबद्दल चिंता देखील व्यक्त करत आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘चल तुला पेट्रोल पंपापर्यंत सोडून येतो’ आदी मजेशीर कमेंट केल्या आहेत.