आजपर्यंत तुम्ही अनेक लग्न समारंभांना हजेरी लावली असेल. या प्रत्येक सोहळ्यातील विविध प्रकारची व्यवस्था लोकांचे लक्ष वेधून घेत असते. काही लग्नसोहळ्यांमध्ये खूप छान, चविष्ट असे जेवण असते, तर काही ठिकाणी सजावट इतकी भारी केलेली असती की ती पाहून आपल्याला फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. त्यामुळे प्रत्येक लग्नसोहळा कोणत्या ना कोणत्या कारणाने खास बनतो. पण, सध्या सोशल मीडियावर अशा एका लग्नसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. या लग्नसोहळ्यात अशी एक गोष्ट करण्यात आली होती, जी पाहून अनेकांना प्रश्न पडला की, मग ह्यांनी एसी हॉलच का नाही बुक केला.

एका लग्नसोहळ्यात सहभागी झालेल्या एका व्यक्तीला अचानक एका भिंतावर अशी एक गोष्ट दिसली, जी पाहून तोही आश्चर्यचकित झाला. यानंतर त्याने ती गोष्ट कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मैदानात सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात एका दूरच्या भिंतीवर चक्क एसी बसवण्यात आला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा एसी खोलीच्या आतील भिंतीवर नाही, तर एका इमारतीच्या बाहेरील भिंतीवर बसवण्यात आला होता. आजपर्यंत तुम्हीदेखील अशाप्रकारे इमारतीच्या बाहेरच्या बाजूने एसी लावल्याचे कधी पाहिलं नसेल. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

हा व्हिडीओ @ak_jadeja_hadamtala या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- अरे भाऊ बंद कर, मला थंडी वाजत आहे. दुसऱ्या युजरने गमतीत लिहिले, हा पराक्रम कोणी केला आहे, त्याला १० लाखांचे बक्षीस. तिसऱ्या युजरने लिहिले, यामुळे येथे थंडी वाढली आहे. तर अनेकांनी बसं एवढं श्रीमंत व्हायचं आहे, अशी प्रतिक्रिया दिली.