Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली छत्रपती शिवाजी महाराजांना तिचा आदर्श मानत असल्याचे सांगत त्यांनी कधी धर्मा-धर्मामध्ये भेदभाव केला नाही, असं ती सांगते. ही चिमुकली Rodrigo Canelas यांच्या पॉडकास्टमध्ये सांगते.

चिमुकली काय म्हणते?

या चिमुकलीचे नाव परिधि मंगलमपल्ली असून ती एक स्टोरी टेलर आहे. ती खूप सुंदर ऐतिहासिक आणि पौराणिक कथा सांगते. ती या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगते, “मी छत्रपती शिवाजी महाराजांपासून खूप प्रभावित झाली आहे कारण शिवाजी महाराजांनी त्यांचा धर्म जपला पण त्यांनी कधीही हिंदू चांगला आहे की मुस्लिम चांगला आहे की शीख चांगला आहे असा भेदभाव केला नाही. त्यांनी कधीही असे केले नाही. भगवद्गीतेत पहा, बायबल, कुराणात लिहिलेले आहे. अगदी सर्व धर्म ग्रंथामध्ये लिहिलेले आहे. संपूर्ण मानवतेत शांतीमय राहण्यास सांगते पण आपण काय करतोय अगदी विरुद्ध आपण अजिबात शांती राखत नाही.

अँकर – तुम्हाला हे पटते का?

चिमुकली – मला हे आवडत नाही जरी कलियुग हे करत असेल तर कल्पना करा की हे आत्ताच असं घडत आहे, भविष्यात काय होईल?”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)

rodrigocanelas या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “‘शिवाजी महाराजांनी धर्माचे रक्षण केले – पण कधीही भेदभाव केला नाही.’
परिधीचे शब्द एक पावरफूल सुचना आहे: खरे नेते न्यायासाठी उभे राहतात, धर्म, जात किंवा पंथाने लोकांना विभाजित करण्यासाठी नाही.

प्रत्येक धर्मग्रंथ – भगवद्गीता, कुराण, बायबल शांती शिकवतात. पण आपण त्यापासून दूर जात आहोत.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विचारसरणीला सलाम हिच्या” तर एका युजरने लिहिलेय, “एवढ्या लहान वयात किती मॅच्युरीटी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “तिच्या आईवडिलांचा अभिमान वाटतो, खूप हुशार आणि आत्मविश्वासू आहे” अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.