Viral Video : आपल्या देशाने गेल्या काही वर्षात खूप प्रगती केली. मेट्रोसिटी पासून अनेक बाबतीत देश उंची गाठत आहे. टेक्नॉलॉजी व अविश्वसनीय सुविधांमुळे नागरिकांचे जीवन सुखमय झाले आहे पण याच देशात असेही लोक आहेत जे या हाय टेक्नॉलॉजी किंवा सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही नि:शब्द होईल.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना सुद्धा एक महिला सीटजवळ खाली बसलेली दिसेल. तिने असे का केले, याविषयी जेव्हा तिला विचारले तेव्हा तिचे उत्तर ऐकून तुम्हालाही काय बोलावे सुचणार नाही. ही महिला नेमकं काय म्हणाली? अन् सीट्स रिकाम्या असताना सुद्धा का खाली बसली असावी? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक बस दिसेल. या बसमध्ये एक महिला तिच्या मुलाला घेऊन सीटजवळ खाली बसलेली दिसत आहे. बसमध्ये अनेक सीट रिकाम्या असताना सुद्धा ती खाली बसलेली पाहून कंडक्टरने तिला विचारले, “तु खाली का बसली आहे?” त्यावर महिलेने जे उत्तर दिले ते ऐकून कोणीही भावुक होईल. ती महिला सांगते की तिला सीटवर बसण्याची सवय नाही. तिचे उत्तर हे दर्शवते ती नेहमी बसमध्ये खाली बसली आहे, ज्यामुळे सीट्स रिकाम्या असताना सुद्धा तिला त्यावर बसावे, असे वाटले नाही.

पाहा व्हायरल व्हिडीओ

Dr.B.Karthik Navayan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ती सांगत आहे की तिला सीटवर बसण्याची सवय नाही त्यामुळे ती बसमध्ये खाली बसून प्रवास करत आहे.
आपले विकासाचे प्रोजेक्ट काही कामाचे नाही जर ते समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ती बसमध्ये खाली यामुळे बसली की तिला कोणीही आजवर सांगितले नाही की तिला सुद्धा सीटवर बसण्याचा हक्क आहे” तर एका युजरने लिहिलेय, “हे देशाचं सत्य आहे, जे अजुनही बदलले नाही”हे खूप दुःखद आहे. आणखी एका युजरने लिहिलेय, “आपण भारतीयांनी गरिबांना माणूस म्हणून सन्मानाने आणि आदराने वागवले पाहिजे.” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी दु:ख व्यक्त केले आहे.