Indian Army Dogs Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आर्मी डॉगचे पथक दिसत आहे. हे श्वान पथक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हे श्वान पथक पाठीवर प्रथमोपचाराची(First Aid) बॅग घेऊन जाताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे पथक अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने जाताना दिसत आहे.

आर्मी डॉग हे सामान्यत: लष्कर किंवा संरक्षण दलामध्ये काम करतात. यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. जसे की शोध, बचाव कार्ये तसेच इतर सुरक्षा संबंधित कामे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला असेच श्वानाचे पथक दिसेल. हे आर्मी श्वान पाठीवर प्रथमोपचाराची(First Aid) बॅग घेऊन जाताना दिसत आहे. बर्फाळ प्रदेशात हे श्वान प्रथमोपचाराची(First Aid) बॅग पाठीवर घेऊन जाताना दिसत आहे. श्वानांचे हे मोठे पथक पाहून कोणीही थक्क होईल. हे आर्मी डॉग नेमके कुठले आहे, याविषयी कोणतीही माहिती नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती नसते.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

View this post on Instagram

A post shared by itz amit shakya 87 (@itz_amit_shakya_87)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे सुद्धा आहेत आपले खरे सैनिक” तर एका युजरने लिहिलेय, “औषधी घेऊन जाताना आमचे जवान” आणखी एका युजरने लिहिलेय, “देशाच्या या सैनिकांना मनापासून सलाम” एक युजर लिहितो, “प्रामाणिकपणा जर शिकायचा असेल तर यांच्याकडून शिकावा” तर एक युजर लिहितो, “चांगले कर्म केले. म्हणून यांना देश सेवा करण्याची संधी मिळत आहे.” एक युजर लिहितो, “आम्हा भारतीयांना यांच्यावर अभिमान आहे” अनेक युजर्सनी या श्वान पथकांचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर जय हिंदचे नारे लिहिले आहेत तर काही युजर्सनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या आहेत.